शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन, शिवसेनेच्या सत्तेची मुहूर्तमेढ रोवणारा शिलेदार हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 19:40 IST

Thane News: ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते.

ठाणे - ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापने पासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. १९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले होते. मराठे यांचे वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून ठाण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले १९७३ साली शिर्डीच्या साईबाबांनी स्वप्नदर्शन देऊन त्यांचं जीवन बदलून टाकलं. मग त्यांनी राजकारण संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. वसंत मराठे यांनी १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचं अखेरपर्यंत जीवित कार्य राहिलं.

ठाण्यात शिवसेनेची पहिले सत्ता आली आणि ठाणे नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. ठाणे नगरपालिकेत पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष वसंत मराठे यांच्या रूपाने बसला. सत्तेची पहिली संधी शिवसेनेला ठाणे नगरपालिकेने दिली. यावेळी १३ ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला होता.या निवडणुकीत  जनसंघाचे ८,प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले. ठाणे  नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी एड. अरविंद  दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सत्तेची पहिली मुहूर्तमेढ रोवणारा शिलेदाराचे हरपला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 महापौरांनी वाहिली आदरांजली 
वसंत मराठे यांचे ठाण्यासाठी असलेले योगदान हे निश्च‍ितच आम्हाला यापुढेही प्रेरणादायी राहिल, मी ठाण्याचा प्रथम नागरिक या नात्याने त्यांना ठाणेकरांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करतो.
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना