शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांची उत्तुंग दाद!

By admin | Updated: February 8, 2016 02:34 IST

ठाण्यात पहिल्यांदा पार पडलेल्या सायकल स्पर्धेवर पुरूष गटात अलिबागच्या निकेत पाटील याने तर महिला गटात पुण्याच्या प्रिताली शिंदे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

ठाणे : ठाण्यात पहिल्यांदा पार पडलेल्या सायकल स्पर्धेवर पुरूष गटात अलिबागच्या निकेत पाटील याने तर महिला गटात पुण्याच्या प्रिताली शिंदे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ठाणे महानगरपालिका आयोजित कला क्र ीडा महोत्सवांतर्गत रविवारी झालेल्या सायकल स्पर्धेला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी २०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.ठाणे जिल्हा मेचअर सायकलिंग असोसिएशन, मुंबई जिल्हा मेचअर असोसिएशन आणि एलसीपी सायकलिंग ग्रुप यांच्या संयुक्तविद्यमाने या स्पर्धेचे आयोजन क रण्यात आले. तीन हात नाका येथून सायकल स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर संजय मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे, ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते. महिला व पुरु ष (खुली) ७० कि.मी.च्या सायकल स्पर्धेची सुरूवात तीन हातनाका येथून झाली. एल आय सी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाईज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोल पंप उड्डाणपूल, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस, डी-मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉईट, कापूरबावडी उड्डाणपूल, इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरु न सरळ, नितिन कंपनी उड्डाणपूलामार्गे परत तीनहात नाका मार्गे अशा तीन फेऱ्या पूर्ण करणे असा स्पर्धेचा मार्ग होता. अंतिम रेषा ही शेवटच्या फेरीत तीन हात नाका येथे होती. तर २२ कि.मी सायकल स्पर्धेला तीन हात नाका येथून सुरूवात झाली. एलआयसी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाईज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोल पंप उड्डाणपूल, विहंग हॉटेल सिग्नल, मानपाडा उड्डाणपूल, ब्रह्मांड नाका सिग्नल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस डी मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉईट, कापूरबावडी उड्डाणपूल, इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरु न सरळ, नितिन कंपनी उड्डाणपूलमार्गे तीन हातनाका येथे स्पर्धेची अंतिम रेषा ठेवण्यात आली होती.खुल्या ७० कि.मी स्पर्धेत पुरूष गटातून निकेत श्रीकांत पाटील (अलिबाग) याने प्रथम, दिलीप मार्तंड माने (सांगली) याने व्दितीय, जमादार शब्बीर जमादार (सांगली) याने तृतीय क्र मांक पटकाविला.खुल्या ७० कि.मी स्पर्धेच्या महिला गटातून प्रिताली शिंदे (पुणे) हिने प्रथम, पूजा कश्यब (मुंबई) हिने व्दितीय, चैताली शिळदणकर (अलिबाग) हिने तृतीय क्र मांक पटाकाविला. २२ कि.मी हौशी सायकल स्पर्धेत पुरूष गटातून प्रथम क्र मांक कुणाल परदेशी, व्दितीय क्र मांक अमर पटेल, तृतीय क्र मांक अनुज फडके यांनी पटकाविला.२२ कि.मी हौशी सायकल स्पर्धेत महिला गटातून अमिषा शहा हिने प्रथम, व्दितीय क्र मांक सरिता वॉयलेट तर तृतीय क्र मांक पुजा पाटेकर हिने पटकाविला.