शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वाहतूक पोलिसांनी एकाच रात्रीत केली ७७ मद्यपी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 22:11 IST

मद्यपी वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम सुरु केली आहे. बुधवारी रात्री अशाच कारवाईमध्ये तब्बल ७७ मद्यपी वाहनचालक आणि ३५ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली.रस्त्यांवर होणारे बहुसंख्य अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते.

ठळक मुद्दे३५ सह प्रवाशांवरही कारवाईचा बडगामद्यपी चालकांविरुद्ध विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मद्यपी वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम सुरु केली आहे. बुधवारी रात्री अशाच कारवाईमध्ये तब्बल ७७ मद्यपी वाहनचालक आणि ३५ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.रस्त्यांवर होणारे बहुसंख्य अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलीस वाहन चालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करतात. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये मद्यपी वाहन चालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांसह सहप्रवाशांवरही कारवाई केली जात आहे. बुधवारी रात्री वाहतूक शाखेच्या १८ विभागांतर्गत विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात ७७ मद्यपी वाहनचालकांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यासोबतच्या ३५ सहप्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. कापूरबावडी विभागाअंतर्गत सर्वाधिक १६ प्रवासी आणि आठ सहप्रवाशांवर कारवाई झाली आहे.* ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी पकडलेल्या एका मद्यपी वाहनचालकासह सहप्रवाशाला सात दिवस कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. विशेष म्हणजे सहप्रवाशाने मद्य प्राशन केले नसतानाही त्यालाही तुरु ंगात जावे लागले होते. काही वाहनचालक आणि सहप्रवाशांना प्रत्येकी दहा हजार रु पये दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. रस्त्यांवरील अपघाताबरोबरच पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी मद्य प्राशन करुन कोणीही वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस