शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवींना मारहाण

By admin | Updated: February 17, 2016 03:26 IST

ठाणे महापालिकेचे उपायुक्त तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, तसेच त्यांचे अंगरक्षक आप्पासाहेब कांबळे यांना क्षुल्लक कारणावरून महापालिकेच्या मुख्यालयातच मारहाण झाल्याची घटना

ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, तसेच त्यांचे अंगरक्षक आप्पासाहेब कांबळे यांना क्षुल्लक कारणावरून महापालिकेच्या मुख्यालयातच मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास घडली. या प्रकरणी सुभाष ठोंबरे यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्या दालनात माहिती अधिकाराबाबतची सुनावणी सुरू होती. त्याच वेळी ठोंबरे आणि माळवी यांच्यात वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की, चवताळलेल्या ठोंबरेंनी माळवींची कॉलरच धरली. या धुमश्चक्रीत त्यांची सोनसाखळीही त्यांनी तोडली. त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शहरातील नागरिकांना ‘ठाणे गौरव’, तसेच अन्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ठोंबरे याने हे पुरस्कार कशाच्या आधारे देण्यात येतात, असा प्रश्न माहिती अधिकारात महापालिकेला विचारला होता. त्यावर माळवींनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने ठोंबरे याने अपील दाखल केले होते. याच मुद्द्यावरून त्याने मंगळवारी त्यांच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. वाद वाढण्यापेक्षा माळवींनी त्याला अखेर तिथून जाण्याचा सल्ला दिला. यानंतर त्याने रणखांब यांच्या दालनातच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या बचावासाठी सरसावलेले अंगरक्षक कांबळे यांनाही त्याने मारहाण केली. या घटनेनंतर ठोंबरेला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध जबरी चोरी करणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणून सरकारी नोकरावर हल्ला करणे, धमकी देणे, तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी दिली. (प्रतिनिधी)