लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इयत्ता बारावीच्या निकालानंतर यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.०४ टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षी ९५.५७ टक्के इतका लागला होता. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्यावर्षीपेक्षा निकालात ००.५३ टक्क्यांनी घसरला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२६ या महिन्यात इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. बहुप्रतिक्षेत असलेला दहावीचा निकाल अखेर शुक्रवारी जाहीर झाला आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कुठे हासू होते तर कुठे अश्रू होते. ज्यांना अपेक्षेप्रमाणे टक्के मिळाले नाही ते मात्र नाराज झाले होते. ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त टक्के मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू ओसांडून वाहत होते. ठाणे जिल्ह्यातून १११३२२ इतके विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यात १०५४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनी निकाल पहिला. सायबर कॅफे, घरी, मोबाईल, संगणकवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
Web Summary : Thane district's Class 10 result is 95.04%, slightly down from last year. Girls outperformed boys again. 105408 students out of 111322 passed the exam. Students celebrated their results online with joy and some tears.
Web Summary : ठाणे जिले का 10वीं का परिणाम 95.04% रहा, जो पिछले साल से थोड़ा कम है। लड़कियों ने फिर से लड़कों को पछाड़ा। 111322 छात्रों में से 105408 परीक्षा में उत्तीर्ण हुए। छात्रों ने खुशी और कुछ आंसुओं के साथ ऑनलाइन परिणाम मनाया।