शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी ठाणे जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार खत-बियाण्यांची हमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 00:02 IST

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने तयारीला गती देत शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे.

ठाणे : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने तयारीला गती देत शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कृषी विभागाची सखोल आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी ठोस मार्गदर्शन केले. वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनाचा बारकाईने आढावा घेण्यात आला. जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच दक्षता घेतली असून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

जिल्ह्यासाठी एकूण ११ हजार ५५० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून त्यात युरिया ९७००, डीएपी २००, एसएसपी १००, एमओपी ५० आणि संयुक्त खते १५०० मेट्रिक टनांचा समावेश आहे. याशिवाय तालुकानिहाय ८५० मेट्रिक टन युरियाचा संरक्षित (बफर) साठा ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये हा साठा उपलब्ध राहणार आहे, ज्यामुळे गरज भासल्यास तत्काळ पुरवठा करता येणार आहे.

खतांचा पुरवठा सुरळीत राहावा आणि शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काळाबाजार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणा अधिक सजग करण्यात आली आहे. तसेच युरियाचा अकृषिक वापर रोखण्यासाठीही विशेष पथके सतर्क ठेवण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांनीही कृषी विभागाला अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी विविध पर्यायी वाणांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले. अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी जिल्ह्यातील खत साठा, बफर नियोजन आणि बियाणे पुरवठा याबाबत सविस्तर माहिती दिली.

या सर्व उपाययोजनांमुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध होऊन उत्पादनवाढीस चालना मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Ready for Kharif Season: Farmers Assured Quality Supplies!

Web Summary : Thane administration ensures timely supply of quality seeds, fertilizers for Kharif season. Adequate stock planned, black marketing prevention measures in place. Farmers urged to adopt varied seed options.
टॅग्स :Farmerशेतकरी