शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तरुणाईला ‘एमडी’चा विळखा

By admin | Updated: September 30, 2015 00:08 IST

एमडी अर्थात मेफे ड्रॉन या विषारी पावडरची नशा करणाऱ्यांच्या संख्येत ठाण्यातील महाविद्यालयीन युवकयुवतींमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

जितेंद्र कालेकर, ठाणेएमडी अर्थात मेफे ड्रॉन या विषारी पावडरची नशा करणाऱ्यांच्या संख्येत ठाण्यातील महाविद्यालयीन युवकयुवतींमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये केंद्र शासनाने एमडीचा अंमली पदार्थांमध्ये समावेश केल्यानंतर यातील आरोपींवर कडक कारवाई होऊ लागल्याने आता हे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले तरीही ठाण्यातील तरुणांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनीही जागृकता दाखवून ‘काहीतरी कर’णे अपेक्षित आहे. म्हणूनच लोकमतने ‘काहीतरी कर ठाणेकर’ या आपल्या मोहिमेत आता एमडीबाबत जनजागरण चळवळ हाती घेतली आहे. या विषयी आपल्या प्रतिक्रीया लोकमत कार्यालयसह काहीतर कर ठाणेकरच्या फेसबुक पेजवर नोंदविण्याचे आवाहन या निमित्ताने लोकमतने केले आहे.एमडीसह चरस, गांजा, हेरॉईन, क ोकेन, एलएसडी आदींचा अंमली पदार्थांमध्ये समावेश होतो. याशिवाय, खोकल्यावरील औषधे रेक्सबुल, रेक्सकॉप, आरकॉप यामध्ये कोडीन फॉस्फेट असल्याने त्याचीही नशेसाठी विक्री होते. तर ट्रॅनॅक्स या गोळीला ‘बटन’ असे संबोधून तिचेही सेवन केले जाते. सध्या, मुंब्रा, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिसरातील शाळकरी मुले हे गांजा, चरस, ब्राऊन शुगर तसेच कोकेन या सर्वांपेक्षाही घातक एमडी च्या आहारी जात आहेत. त्याची एका प्लॉस्टीकच्या पिशवीतून विक्री होणारी ही पावडर ८०० रूपयांमध्ये १०० ग्रॅम अशी विकली जाते. तिच्या सेवनाने झोप आणि भूक लागत नाही. तात्पुरता उत्साह जाणवतो. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तिच्या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लैंगिक क्षमताही वाढते, असा समज आहे. पान मसाला, गुटख्यात किंवा नाकाने ही पावडर ओढली जाते. सुरुवातीला एक दोन वेळा मोफत देऊन एमडीची सवय लावली जाते. नंतर दोन ग्रॅमची विक्री करुन एक ग्रॅम मोफत देण्याचे प्रलोभन दिले जाते. त्यानंतर मात्र संबंधित तरुण किंवा तरुणी या एमडीच्या आहारी गेलेली असते.