शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश पाटील यांची आत्महत्या

By admin | Updated: February 20, 2016 01:47 IST

पालघर येथील पालघर सायकल मार्ट या प्रसिद्ध दुकानाचे मालक सुरेश बाबुराव पाटील (५६ वर्षे) यांनी शुक्रवारी पालघरच्या श्रीराम बिल्डिंग, रामकृष्णनगर या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली

पालघर : पालघर येथील पालघर सायकल मार्ट या प्रसिद्ध दुकानाचे मालक सुरेश बाबुराव पाटील (५६ वर्षे) यांनी शुक्रवारी पालघरच्या श्रीराम बिल्डिंग, रामकृष्णनगर या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये एका माजी नगरसेवकासह अन्य एका व्यक्तीने कर्ज परत करण्याचा तगादा लावल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.पालघर येथे ५०-६० वर्षांपासून राहणाऱ्या पाटील परिवाराचे पालघर सायकल मार्ट हे तालुक्यातील सर्व प्रकारच्या सायकली मिळण्याचे प्रसिद्ध दुकान होते. हीरो, अ‍ॅटलस या नामवंत कंपन्यांच्या सायकलींची एजन्सी त्यांच्याकडे होती. कालांतराने सुरेश पाटील यांनी आपला सायकलविक्रीचा वेगळा व्यवसाय सुरू केला. अंबामाता रोडजवळील आपल्या एका दुकानाची विक्री करून आणि एक दुकान भाड्याने देऊन त्याने भिवंडी येथे टायरचे दुकान सुरू केले आणि पालघर सोडून ते ठाणे येथे राहण्यासाठी निघून गेले. ३-४ दिवसांपूर्वी ते नेहमीप्रमाणे पालघरमध्ये आले. मात्र, गुरुवार रात्रीपासून ते मोबाइल उचलत नसल्याने त्यांच्या मुलाने पालघरमधील आपल्या एका मित्राला फोन करून वडिलांची चौकशी करण्यास सांगितले. आज सकाळी त्या मित्राने त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेतल्याचे मित्राच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. (वार्ताहर)