शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा विभागाच्या ‘त्या’ ९० धाडी रित्याच

By admin | Updated: October 31, 2015 00:05 IST

अवैध साठ्याविरोधात ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने ग्रामीण भागात हाती घेतलेल्या धाडसत्रांची संख्या ९३ वर पोहोचली आहे. यामध्ये ९० धाडींत पुरवठा विभागाला हात हलवत परतावे लागले आहे

पंकज रोडेकर, ठाणे अवैध साठ्याविरोधात ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने ग्रामीण भागात हाती घेतलेल्या धाडसत्रांची संख्या ९३ वर पोहोचली आहे. यामध्ये ९० धाडींत पुरवठा विभागाला हात हलवत परतावे लागले आहे. अवघ्या तीन धाडींत पुरवठा विभागाच्या हाती मसूरडाळ आणि खाद्यतेलाचा साठा हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत डाळी, खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर भाव अचानक वाढल्याने जनतेतील वाढता रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने साठेबाजांवर धडक कारवाई करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये विभागाने धाडसत्र हाती घेतले. त्या स्थानिक तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली टाकल्या आहेत. विशेष म्हणजे शहापूर तालुक्यात टाकलेल्या तीन धाडीत करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधील दोन धाडीत मसूरडाळ आणि एका धाडीत खाद्यतेलाचा समावेश आहे. अन्य तालुक्यांमध्ये टाकलेल्या धाडीत अवैध साठा मिळून आलेला नाही.आतापर्यंत तालुक्यातील ग्रामीण भागात ९३ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. तसेच तीन धाडींत करोडोंचा साठा जप्त केला असून अशा प्रकारे हे धाडसत्र सुरूच राहणार आहे.- मोहन नळदकर, पुरवठा अधिकारी, जिल्हा ठाणे