शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीचे निकृष्ट काम बंद

By admin | Updated: June 9, 2014 00:20 IST

बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने १९७५ साली अंगणवाडी हा पर्याय आणला

नायगाव : बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने १९७५ साली अंगणवाडी हा पर्याय आणला. वसईतील अर्नाळा येथे मात्र या अंगणवाडी बांधणीचा पायाच कमकुवत झाल्याने सदर अंगणवाड्यांची बांधकामे किती काळ टिकतील याबाबत शंका आहे. अर्नाळ्यातील असाच निकृष्ट बांधकामाचा ग्रामस्थांनी चांगलाच समाचार घेत हे काम बंद पाडले.अर्नाळा ग्रा. पं. हद्दीतील विविध ठिकाणी ३ अंगणवाड्या मंजूर झाल्या. त्यासाठी १८ लाख रू. चा निधीही पुरवण्यात आला, मात्र बच्यावपाडा येथे उभी राहणारी अंगणवाडीची वास्तु स्थानिकांनी बंद पाडली. बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून लोखंडी सळ्या गंजलेल्या स्थितीतच वापरण्यात येत असल्याचा स्थानिकांनी यावेळी आरोप केला. कंत्राटदाराला तुर्तास हे काम थांबवण्यास भाग पाडले आहे. परंतु पुढे काय? पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यातच उशिराने सुरू झालेल्या या कामाच्या मजबुतीबाबत शंका आहेत. यापुर्वी रहिवाशांपैकी एखाद्या घरात अंगणवाडी भरवली जायची, मात्र आता स्वतंत्र नव्याने अंगणवाड्या उभ्या राहणार असल्याने स्थानिकांत समाधान होते.या विकासकामात निकृष्ट साहित्य वापरून कंत्राटदार स्वत:चा फायदा करून घेणार आहेत, मात्र अशा स्वरूपाच्या वास्तु किती काळ टिकतील याबाबत शंका असल्याने दु्रतगतीने सुरू असलेले हे बांधकाम रहिवाशांनी बंद पाडले. प्रतिकुल घटकांचे निराकरण होऊन ३ वर्षाखालील बालकांचे संवर्धन व्हावे, म्हणून केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणली. त्याचे फायदे स्थानिकांना मिळण्यापुर्वीच थेट बांधकामातच गोंधळ असल्याने योजनांवर प्रश्नचिन्ह असल्याने स्थानिक आक्रमक आहेत. (वार्ताहर)