शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचा शहापूरमध्ये छापा: चार लाख ८२ हजारांचे विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 22:51 IST

शहापूर येथील सापगाव, भातसा नदीच्या पूलावरुन अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या मनोज मोरे याला बनावट विदेशी मद्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सोमवारी अटक केली.

ठळक मुद्दे कोकण विभागीय भरारी पथकाची कामगिरी चार लाख ८२ हजारांच्या मद्यासह १२ लाख ८४ हजार १२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कार चालकाला अटक

ठाणे: दमण निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणा-या मनोज संजय मोरे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने शहापूर येथील दहागाव येथून सोमवारी अटक केली. त्याच्याकडून चार लाख ८२ हजारांच्या मद्यासह १२ लाख ८४ हजार १२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शहापूर येथील भातसा नदीच्या ब्रिजवर सापगाव येथे अवैध मद्य वाहतूक एका कारमधून होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, कोकण विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण आणि अंमलबजावणी आणि दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, अ‍े. बी. पाटील, जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, अविनाश जाधव, जगन्नाथ आजगावकर, मोहन राऊत, दीपक दळवी आणि सदानंद जाधव आदींनी १९ आॅगस्ट रोजी सापगाव येथील भातसा नदीच्या पूलावर केलेल्या वाहनांच्या तपासणीमध्ये एका संशयित कारमध्ये दमण निर्मित विदेशी मद्याचा साठा मिळाला. वाहनाचा चालक मनोज मोरे याच्या दहागाव (ता. शहापूर, जि. ठाणे) येथील घर झडतीमधून चार लाख ८२ हजार ३२४ रुपयांचे विदेशी मद्याचे ४१ बॉक्स आणि नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल्स तसेच सेल फॉर महाराष्टÑ स्टेट ओन्ली असे नाव असलेले बनावट लेबल्सही बाटल्यांवर चिकटवलेले आढळून आले. याप्रकरणी मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुय्यम निरीक्षक अनिल राठोड हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी