शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बहीण-भावाच्या नात्याला फासला काळिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:22 AM

सावत्र बहिणीलाच आई बनविणाऱ्या भावाविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर : सावत्र बहिणीलाच आई बनविणाऱ्या भावाविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशेळे गावात अल्पवयीन मुलगी आई, वडील व सावत्र भावासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी आई व वडील भिवंडी येथे मोलमजुरीचे काम करण्यासाठी गेल्यावर अल्पवयीन मुलगी सावत्र भावासोबत राहत होती. २६ वर्षांच्या भावाचे लग्न झाले असून त्याची पत्नी काही कारणास्तव माहेरी गेली. या दरम्यान अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान मुलीची आई घरी आल्यानंतर लहान बाळ घरात दिसले. याबाबत विचारणा केल्यावर, सावत्र भावाने मुलगी मुंबईला सापडल्याचे सांगितले. तसेच बाळाचा सांभाळ करण्याचे सांगून त्याच्या संगोपनासाठी जळगाव येथे आजी-आजोबा यांच्याकडे पाठविले असे सांगितले.जळगाव जिल्ह्यातील एका गावात लहान मुलांची चर्चा होऊन गावाच्या पोलीस पाटील यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड होऊन सावत्र भावाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील चौकशीसाठी गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करून पोलिसांनी सावत्र भावाला अटक केली.>न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिच्या मुलीवर जळगाव येथे उपचार सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे.