शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एकाच मोहिमेत गिर्यारोहकांनी सर केले सह्याद्रीमधील १२ सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:48 AM

गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेची रेंज सुळके क्लायम्बिंग मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडव्हेंचर इंडिया आणि जिद्दी माउंटनिरिंग ...

गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेची रेंज सुळके क्लायम्बिंग मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडव्हेंचर इंडिया आणि जिद्दी माउंटनिरिंग या संस्थांनी खोडकोना–मेढवन रेंजमधील नऊ सुळके, अडसूळ, भावाचा ढूक (अजिंक्य) आणि महालक्ष्मी असे पालघर जिल्ह्यातील एकूण १२ सुळके १४ ते १८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान यशस्वीरीत्या सर केले. या सर्व सुळक्यांची उंची साधारण ४०-१५० फूट होती. ही संस्थेची १७ वी मोहीम होती.

या मोहिमेत मंगेश कोयंडे, अरविंद नवेले आणि अमोल अळवेकर सहभागी झाले होते. १४ फेब्रुवारी २०२१ ला टीम डोंबिवलीमधून बाइकने प्रवास करून दुपारी खोडकोना गावात पोहाेचली. १५ फेब्रुवारीला नवेले यांनी लीड करून केएम १ आणि केएम ४ असे सुळके सर केले, तर अळवेकर यांनी लीड करून केएम २, ३, ५ असे सुळके सर केले. मागोमाग इतर सदस्य सुळक्यांवर पोहाेचले. १६ फेब्रुवारीला नवेले यांनी लीड करून केएम ६, ७, ९ सुळके तर अळवेकर यांनी लीड करून केएम ८ असे सुळके सर केले. १७ फेब्रुवारी रोजी कोयंडे यांनी लीड करून अडसूळ सुळका, तर नवेले यांनी लीड करून भावाचा ढूक हा अजिंक्य सुळका सर केला. सोबत बाकी सदस्यदेखील होते. १८ फेब्रुवारी रोजी नवेले यांनी पुन्हा लीड करून महालक्ष्मी सुळका सर केला आणि सोबत इतर सदस्यदेखील होते.

या मोहिमेत सिक्वेन्स क्लाइंबिंग पद्धतीचा वापर करून गाइडमन, मिडलमन आणि एण्डमन अशी आरोहणाची तांत्रिक पद्धत वापरली. मोहिमेमध्ये माउंटेनिरिंग रोप, कॅराबिनर, डिसेंडर, क्विकड्रॉ, पिटोन, टेपस्लिंग, डायनिमा, हॅमर, हार्नेस, हेल्मेट, पीए शूज अशा साधनांचा वापर केला. ओव्हरहँग, चिमणी क्लाइंबिंग, क्रॅक क्लाइंबिंग, चेन बोल्टिंग अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून क्लाइंबिंग पूर्ण केले.

सर्व सुळक्यांच्या माथ्यावर टीमने राष्ट्रीय ध्वज आणि स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकवला. शिवरायांच्या नावाची ललकारी दिली आणि जयघोषही केला होता. संस्थेची ही सुळके क्लाइम्बिंग मोहीम आमचे गुरू दिवंगत अरुण सावंत आणि दिवंगत राजू मोरे यांना समर्पित करत आहोत, असे कोयंडे यांनी सांगितले.

--------