शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या आयुक्तांवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: May 19, 2017 04:00 IST

मागील १० दिवसांपासून ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरासह जांभळीनाका, घोडंबदर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. तिच्या विरोधात नाराजीचा सूर

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मागील १० दिवसांपासून ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरासह जांभळीनाका, घोडंबदर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. तिच्या विरोधात नाराजीचा सूर एकीकडे उमटत असतांना दुसरीकडे आयुक्तांच्या कारवाईचे काही दक्ष ठाणेकरासह सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे. तशी पत्रे पालिका आयुक्तांच्या मेलवर धडक आहेतच, शिवाय लेखी पत्रेही आयुक्तांच्या दालनात येऊ लागली आहेत. उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर फेरीवाल्यांकडून हल्ला झाल्यानंतर गुरुवारी सांयकाळी आयुक्तांनी संतापाच्या भरात येथील २८ गाळे भुईसपाट केले. तसेच फेरीवाल्यांसह स्टेशन परिसरातील रिक्षा चालक, रस्त्यावर बेकायदा पार्किंग करणाऱ्यावाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. सलग दहा दिवस ही कारवाई सुरु असून आता खऱ्या अर्थाने स्टेशन परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. रिक्षा चालकांनादेखील शिस्त लागली असून जे रिक्षा चालक एखाद्या प्रवाशावर एकत्रित हल्ला बोल करीत होते, तेच रिक्षा चालक आज काहीसे प्रामाणिक झाल्याचे दिसत आहेत. या भागात कारवाई करतांनाच हिरानंदानी मेडोज, लोकपुरम, कापूरबावडी, मानपाडा, हायपरसिटी मॉल कासारवडवली, मुंब्रा आदी भागातही कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. परंतु, या कारवाई दरम्यान आयुक्तांनी कायदा हातात घेतल्याने त्यांच्या विरोधात एक मतप्रवाह तयार झाला असून अनेकांनी तर त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीचे चित्रण आणि छायाचित्रे पोलीस आयुक्तांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील आयुक्तांच्या या दबंगगीरीचा विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीला कारवाईत आक्रमक असलेल्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही दिवसांपासून मवाळ भूमिका स्वीकारली आहे. सोशल मिडीया आणि नागरिकांनी थेट आयुक्तांच्या या दबंगगिरीचा निषेध केल्याने आयुक्तांनीच थेट नागरिकांचा चालता फिरता जनता दरबार घेऊन कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांनी त्यांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.