शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्यानंतर पती झाला पोलीस ठाण्यात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:52 AM

चारित्र्याच्या संशयातून लक्ष्मी कटवा (२०) या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून करुन तिला पेटवून दिल्यानंतर पती आकाश मेघजी कटवा (२४) याने स्वत:च पोलीस नियंत्रण कक्षात खूनाची माहिती दिली. त्यानंतर तो स्वत: कळवा पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली.

ठळक मुद्दे हत्या केल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातही दिली माहितीखूनानंतर मृतदेह दिला पेटवून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चारित्र्याच्या संशयातून लक्ष्मी कटवा (२०) या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून करुन तिला पेटवून देणाऱ्या आकाश मेघजी कटवा (२४) या पतीला कळवा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. हत्येनंतर स्वत:च पोलीस नियंत्रण कक्षामध्ये माहिती देऊन तो कळवा पोलीस ठाण्यात हजर झाला.आकाश आणि लक्ष्मी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांमध्येही किरकोळ कारणावरुन वारंवार वाद होत होते. दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तिच्या चारित्र्यावरील संशयातून १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्याने तिच्या गळयावर सुरीने वार करुन अत्यंत निर्घृणपणे तिचा खून केला. कहर म्हणजे खूनानंतरही त्याने तिच्या अंगावर टर्पेटाईन टाकून तिला पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वत: ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात पत्नीच्या खूनाची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर तो स्वत: कळवा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने पत्नीच्या खूनाची कबूली दिली. सहायक पोलीस निरीक्षक सागर गोंटे यांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक सुराही जप्त केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोंटे हे करीत आहेत. त्याला २५ डिसेबंरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून