ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:16 IST2026-04-15T09:16:07+5:302026-04-15T09:16:34+5:30
Thane Crime News: ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार सुधीर काेकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदेसेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड (५९) यांच्यासह चार जणांनी शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख नरेश मालुसरे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला.

ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार सुधीर काेकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदेसेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड (५९) यांच्यासह चार जणांनी शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख नरेश मालुसरे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला. त्यातील जयंत उर्फ जॅकी भाेईर (३७) याने मालुसरे यांना गाेळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धावड याच्यासह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी दिली.
मालुसरे १३ एप्रिलला रात्री १२:३० वाजेच्या सुमारास टेंभीनाका येथील शाखेजवळ दुचाकी घेण्यासाठी मालुसरे गेले हाेते. त्यावेळी अनिल उर्फ बाळा, जयंत उर्फ जॅॅकी, खली (रा. काेपरी) आणि देशमुख आदींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली, असे मालुसरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
निखिल बुडजुडे यांच्या गटाने मालुसरे यांच्यावर हल्ला केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मी १४ हजार मतांनी निवडून आलाे. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदेसेनेचे नगरसेवक सुधीर काेकाटे यांनी केली.