शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेची एकहाती सत्ता, विरोधक साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 10:20 IST

अजित मांडके ठाणे महापालिकेत शिंदेसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आणण्यात त्यांना यश ...

अजित मांडके

ठाणे महापालिकेत शिंदेसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आणण्यात त्यांना यश तर आले आहेच, शिवाय आठ जागांमध्ये वाढ आहे. दुसरीकडे भाजपने २८ जागा मिळवून वेळप्रसंगी विरोधी बाकावर बसण्याची भूमिका जाहीर केली आहे. असे असताना जे विरोधात लढले होते, त्यातील एकाही पक्षाचे संख्याबळ हे विरोधी पक्षनेता मिळविण्यापर्यंत पोहोचले नसल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले तर ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नसेल.

ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात स्पष्ट संदेश दिला आहे. १३१ जागांच्या महापालिकेत शिंदेसेनेने ७५ जागा जिंकत पुन्हा एकदा सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. या निकालामुळे ठाण्यातील सत्ता समीकरणे पुन्हा शिंदेसेनेच्या बाजूने झुकली असून, पुढील पाच वर्षे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचाच एकछत्री अंमल असेल हे निश्चित आहे. भाजपने २८ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेत सहभागी होता आले नाही तर आपण विरोधी बाकावर शहराच्या विकासाच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांवर लक्ष देऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र शिंदेसेनेकडून भाजपने सत्तेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजप विरोधी बाकांवर गेल्यास त्यांना विकासकामे, निधीवाटप, प्रशासनातील पारदर्शकता आणि सत्ताधाऱ्यांचे निर्णय यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करता येतील.

या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान झाले ते उद्धवसेना, मनसे आणि काँग्रेसचे. उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरीदेखील त्यांचा अवघा एक नगरसेवक पालिकेत गेला आहे. तिकडे मनसेला सलग तिसऱ्या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी त्यांचा एकही सदस्य सभागृहात असणार नाही. एमआयएममुळे राष्ट्रवादी (शरद पवार)ला धक्का बसला आहे. एमआयएमचे १२ नगरसेवक पालिकेत निवडून आले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार)चे ९ सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेस देखील ठाण्यातून हद्दपार झाली आहे. किंबहुना कॉंग्रेसमुक्त ठाणे हे महायुतीने सिद्ध करुन दाखविले आहे.  

विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी (शरद पवार)च्या नगरसेवकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने केवळ सत्ता दूर गेली असे नाही, तर आता विरोधी पक्षनेतेपद मिळवणेही या राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेनेला कठीण होणार आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी किमान १४ नगरसेवकांची अट असते. मात्र उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडे ही संख्या गाठण्याइतकी ताकद नसल्याने त्यांना हा महत्त्वाचा संवैधानिक दर्जा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे सभागृहात त्यांचा आवाज आणखी कमजोर होण्याची चिन्हे आहेत. एकूणच, ठाणे महापालिकेचा हा निकाल शिंदेसेनेला सत्तेची पुनर्स्थापना करणारा, भाजपला मजबूत विरोधी भूमिका देणारा आणि उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) यांना राजकीय आत्मपरीक्षणास भाग पाडणारा ठरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Sena Dominates Thane, Opposition Wiped Out in Election

Web Summary : Shinde's Sena secured a landslide victory in Thane Municipal Corporation elections, gaining a stronger hold. BJP is second, ready to play opposition. Major losses for Uddhav Sena, MNS, and Congress. No opposition leader as no party meets minimum criteria.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदे