शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

शिंदे-आव्हाड मैत्रीला फुटला पाझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:21 IST

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; शिवसेनाही फोडण्याचे डावपेच सुरू

- अजित मांडके ठाणे : येत्या २६ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. नाईक यांच्या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप प्रभावशाली ठरण्याची चिन्हे दिसू लागताच हे ‘नाईकअस्त्र’ परास्त करण्याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मैत्रीला पाझर फुटला आहे. नाईकांच्या संपर्कात असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना रोखण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले असून स्थायी समिती गठीत करण्यावरून परस्परांना खिंडीत गाठणाऱ्या या दोन्ही पक्षांनी ही समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतून संदीप नाईक आणि सागर नाईक यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून खुंटीला टांगत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, आता गणेश नाईक हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. २६ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत मोठ्या सोहळ्यात नाईक यांचा भाजप प्रवेश होईल.या सोहळ्याला नाईक हे एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार नसून नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर शिवसेनेच्या आठ नगरसेवकांनाही सोबत घेऊन ते प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ते स्वत: फोन करून घड्याळ काढण्यासाठी आग्रह धरीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर आदी शहरांसह ग्रामीण भागातून अनेक नगरसेवक, पदाधिकारी नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.ठाण्यात तर नाईक राष्ट्रवादीला खिंडार पाडणार असल्याचे संकेत प्राप्त होत असून ठाण्यातील त्यांच्या मर्जीतील काही शिवसेनेच्या नगरसेवकांना नाईक फोन करून संपर्क साधत असल्याची माहिती आहे. नाईकांनी व पर्यायाने भाजपने अशा पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला थेट आव्हान दिल्याने ठाण्यातील या दोन्ही पक्षांच्या गोटातही खळबळ माजली आहे. भाजपच्या भात्यातील हे नाईकअस्त्र रोखण्यासाठी आता एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांच्या जुन्या मैत्रीला पुन्हा पाझर फुटला आहे. नाईकांच्या संपर्कात असलेल्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना थोपवण्याचे काम सध्या शिवसेनेकडून सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्याच सूत्रांनी दिली. नाईकांच्या निकटवर्तीय नगरसेवकांना फोन करून, आता पक्ष सोडू नका, योग्य वेळी तुमची काळजी घेऊ, असे सांगून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.शिवसेनेने ठाणे महापालिकेतील स्थायी समिती गठीत करण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती आहे. नियमानुसार स्थायी समितीचे गठन न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक घेताना कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले, तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधिज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. त्याचाच आधार घेत आता स्थायी समिती सभापतीपदाचा मार्ग मोकळा करून घेतला आहे.परंतु, यासंदर्भात आक्षेप घेणारी याचिका राष्टÑवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, अचानक राष्ट्रवादीच्या मंडळींनी ही याचिका मागे घेऊन शिवसेनेला टाळी देत, स्थायी समितीचा मार्ग मोकळा केला आहे. नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेनंतर झालेल्या या घडामोडींकडे राजकीय जाणकार शिंदे-आव्हाड यांच्या जुन्या मैत्रीला फुटलेला पाझर म्हणून पाहत आहेत.धोका ओळखून आधीच हातमिळवणी?गणेश नाईक भाजपमध्ये आल्यानंतर ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद आपसूक वाढणार आहे. नाईक हे यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले असल्याने त्यांची जिल्ह्याशी नाळ जोडली गेली आहे. भाजपकडून त्यांना पुन्हा ठाण्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याचीही शक्यता आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यावर नाईक हे शिंदे व आव्हाड यांची आणखी कोंडी करण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून तत्पूर्वीच त्या दोघांनी हातमिळवणी केली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGanesh Naikगणेश नाईकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा