शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:38 IST

Rahul Gandhi On Parth Pawar Land Deal: पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 

Rahul Gandhi On Parth Pawar Land Case: ज्यांनी जमीन चोरली आहे, ते मते चोरूनच सत्तेत आले आहेत. मोदीजी गप्प आहेत आणि त्यांचे मौन बरंच काही सांगून जात आहे. कारण लुटारूंच्या पाठिंब्यावरच त्यांचं सरकार टिकलेले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महायुती सरकार आणि पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले. पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणावरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. 

राहुल गांधी यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाबद्दल एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये १८०० कोटी रुपयांची शासकीय जमीन, जी मागासवर्गीयांसाठी राखीव होती, ती फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये मंत्र्याच्या मुलाला विकण्यात आली. त्यात मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. म्हणजे एक तर लूटही केली आणि त्यावर कायदेशीर करण्यातही सूट देण्यात आली", असे राहुल गांधी म्हणाले.  

ते मते चोरून पुन्हा सत्तेत येणार -राहुल गांधी 

"ही जमीन चोरी त्या सरकारने केली आहे, जे मत चोरी करून सत्तेत आले आहे. त्यांना माहिती आहे की, कितीही लुटले तर मते चोरून पुन्हा सत्तेत येता येणार आहे. ना लोकशाहीची काळजी आहे, ना जनतेची; ना मागासवर्गीयांच्या अधिकारांची", अशी टीका राहुल गांधींनी यांनी भूखंड घोटाळ्यावर केली. 

राहुल गांधींचा मोदींना सवाल

"मोदीजी, तुमचं मौन बरंच काही सांगून जात आहे. जे मागासवर्गीय आणि वंचितांचे हक्क हिरावून घेत आहे, त्याच लुटारूंवर तुमचे सरकार टिकलेले आहे म्हणूनच मोदीजी तुम्ही गप्प आहात का?", असा सवाल राहुल गांधी यांनी मोदींना केला.  

पुण्यातील कोरेगाव पार्क भागात तब्बल १८०० कोटी रुपये किंमत असलेला भूखंड पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त ५०० रुपये भरले. हे सगळं कागदोपत्री समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Land stolen by those who stole votes: Rahul Gandhi attacks

Web Summary : Rahul Gandhi slams government over Parth Pawar land deal, alleging corruption and injustice towards marginalized communities. He questions Modi's silence, suggesting the government relies on looters.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीparth pawarपार्थ पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती