शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचे ‘शहापूर’ पाणीटंचाईने त्रस्त! विहिरींनी तळ गाठला; आठ गावे, ४५ पाडे तहानलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:15 IST

प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू

पंडित मसणे, लोकमत न्यूज नेटवर्क, वासिंद: उन्हाच्या चटक्याबरोबरच शहापूरमधील नागरिकांना पाणीटंचाईचे चटकेही सोसावे लागत आहेत. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि ४५ पाडे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावपाड्यांतील महिलांना शेकडो किलोमीटर डोक्यावरूनच पाणी आणून तहान भागावावी लागत आहेत.

धरणांचा ताल शहापूर तालुक्यातील दरवर्षी फेब्रुवारी ते जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील गाव-पाड्यांत निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची समस्या सुटावी, यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजुरीसाठी प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईवर उपाय योजना केल्या जात आहेत.

दरवर्षीचे रडगाणे

दरवर्षी अनेक गाव-पाड्यांत टंचाई जाणवते. या निर्माण होणाऱ्या टंचाईच्या समस्येसाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना आखून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. २०२४-२५ या वर्षासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून प्रस्तावित केला. यंदा तालुक्यात जानेवारी ते जूनदरम्यान ३०६ गावे व ५६३ पाडे, असे एकूण ८६९ गाव-पाड्यांत टंचाई जाणवत आहे.

तालुक्यात ३३ टँकरची मागणी

ही टंचाईची समस्या सोडविण्यासाठी या गाव-पाड्यांत सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीटंचाई म्हणून मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या २४ गावे व ११६ पाडे यासाठी एकूण ३३ टँकरची मागणी असून, या अनुषंगाने सध्या मिळालेल्या मंजुरीनुसार तालुक्यातील १६ गावे, ७१ पाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली, तर पंचायत समिती स्तरावर दोन गावे व आठ पाड्यांसाठी दोन टँकर प्रस्तावित आहेत.

पंधरा कोटींचा आराखड्यावर खर्च

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा शहापूर उपविभागांनी विविध योजनांच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविला आहे. यामध्ये टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबर बुडक्या घेणे, गाळ काढून विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहण व प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना करणे.
नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती, पूरक नळ पाणीपुरवठा योजना करून विंधन विहिरी घेणे व विहिरीची दुरुस्ती करणे, या विविध उपाययोजनांचा आराखड्यात समावेश केला आहे, तर या प्रस्तावित योजनाकामी १५ कोटी ४७ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Shahapurशहापूरwater shortageपाणीकपात