शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

सातवा वेतन आयोग शिवसेनेमुळे रखडला; ठराव मंजूर करण्याबाबत केडीएमसीत टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:32 AM

विकास म्हात्रे यांचा आरोप : राज्य शासनाच्या आदेशानंतरही केला नाही महासभेत ठराव

कल्याण : महापालिका कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील ठराव मंजूर करून तो सरकारकडे पाठवा, असे सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने सांगितले होते. भाजपने लक्षवेधी सूचना मांडून याकडे सत्ताधारी शिवसेनेचे लक्ष वेधले होते. मात्र, शिवसेनेकडून हा ठराव मंजूर करण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात असल्याने तत्कालीन सरकारच्या आदेशाचा अवमान केला गेला, असा आरोप स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केला आहे.

जुलै २०१८ मध्ये राज्यातील महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश तत्कालीन भाजप सरकारने दिले होते. मात्र, शिवसेनेकडून हा प्रस्ताव महासभेत मांडला गेला नाही. उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी महासभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. महापौरांनी हा प्रस्ताव पटलावर घेतला नाही. आयुक्तांकडून तो प्रशासकीय पातळीवर महासभेत मांडला गेला नाही. त्याची विचारणादेखील महापौरांनी केली नाही. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून तो सरकारदरबारी पाठविण्यात शिवसेनेकडून जाणीवपूर्वक दिरंगाई झालेली आहे. महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेतील पदाधिकारी हे शिवसेनेचे आहेत. सत्ताधारी शिवसेनेविरुद्ध शिवसेना युनियनच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते. यावरून शिवसेनेचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे, हे उघड होते, असे म्हात्रे म्हणाले. स्थायी समितीत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असतानाही भाजपचे म्हात्रे हे सभापतीपदी निवडून आले. शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली.

आता सभापती म्हात्रे यांनी शिवसेनेवर सातव्या वेतन आयोगाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी महापालिकेतील कामगार संघटना व त्यांच्या आंदोलनास भाजपचा पाठिंबा असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. हा प्रस्ताव २० जानेवारी रोजी होणाºया महासभेत मंजूर करून तत्काळ सरकारदरबारी पाठविला जावा, यासाठी म्हात्रे यांनी पुन्हा लक्षवेधी सूचना मांडली आहे.

याबाबत महापौर विनिता राणे म्हणाल्या की, हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडून मांडला जाणार होता. आयुक्तांना तसे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीकरिता महासभेकडे पाठविला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. प्रस्तावाला विलंब झाला आहे, हे खरे असले तरी भाजपने आपली राजकीय पोळी भाजू नये, असा सल्ला राणे यांनी दिला आहे.कामगार सेनेतर्फे द्वारसभासातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडला नसल्याच्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने गुरुवारी महापालिका मुख्यालयात द्वारसभा घेण्यात आली. या सभेला संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील व प्रकाश पेणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्वारसभेत कामगारांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर, कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी सातव्या वेतनाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्याचे आश्वासन दिले.

सातव्या वेनत आयोगाकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद अपुरी असली, तरी प्रस्ताव सरकारदरबारी पाठवून त्याला मंजुरी मिळाल्यावर महापालिकेच्या तिजोरीवर दरमहा वेतनापोटी पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. हा बोजा वर्षाला ६० कोटी रुपयांच्या घरात असू शकतो, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपा