शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यांनी शोध

By admin | Updated: June 25, 2016 01:27 IST

वसई गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उत्तरप्रदेशात पळवून नेणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

वसई : वसई गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उत्तरप्रदेशात पळवून नेणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या आईने त्यासाठी तब्बल आठ महिने पोलिसांशी संघर्ष करावा लागला होता.
वसई गावातील झेंडाबाजार येथे राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील फरजाना शेख यांनी आपल्या १६ वर्षाच्या मुलीला याच परिसरात काही दिवसांपूर्वी रहावयास आलेल्या सद्दाम अन्सारी (२२) याने १९ आॅक्टोबर २०१५ रोजी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी मात्र प्रेम प्रकरणातून मुलगी पळाली असल्याचे कारण पुढे करीत दुर्लक्ष केले होते. मात्र, फरजाना यांनी आपल्या मुलीच्या शोधासाठी पोलिसांशी संघर्ष सुरु केला. स्थानिक पोलीस दाद देत नसल्याने फरजाना यांनी वरिष्ठांचेही उंबरठे झिजवले होते. शेवटी वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सद्दामला शोधण्यासाठी पोलीस पथक तीनवेळा उत्तरप्रदेशातही जाऊन आले.
दुसरीकडे सद्दामने त्या मुलीशी लग्न करून ती २० वर्षांची असल्याचा खोटा दाखला तयार करून अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर केला होता. मात्र, फरजाना यांनी सदरचा दाखला खोटा ठरवून खरा दाखला सादर केल्यानंतर सद्दाम त्या मुलीला घेऊन पळाला होता. शेवटी पोलिसांनी सद्दामला गोरखपूर जिल्ह्यातील एका गावातून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)