शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त लष्कर अधिकारी मेजर सुभाष गावंड यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 7, 2026 13:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: निवृत्त लष्कर अधिकारी तसेच ठाणे भुषण मेजर सुभाष गावंड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते८७ वर्षाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: निवृत्त लष्कर अधिकारी तसेच ठाणे भुषण मेजर सुभाष गावंड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते८७ वर्षाचे होते. मेजर सुभाष गावंड (निवृत्त) हे भारतीय सैन्यातील ८ महार रेजिमेंटचे एक अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचे प्रशिक्षण सुरू केले. 

ते ८ महार रेजिमेंट (परमवीरचक्र बटालियन) मध्ये कार्यरत होते आणि सैन्यातील जात-पातविरहित, धर्मनिरपेक्ष संस्कृतीवर त्यांचा अढळ विश्वास होता. ठाणे पूर्व (वाल्मीक नगर, मिठाबंदर रोड) येथे त्यांची आहे, जिथे एअर रायफल आणि पिस्तूल शूटिंगचे प्रशिक्षण दिले जाते. `मेजर मेमरीज' आणि `लष्कराच्या भाकर्या चवदार' ही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. मेजर सुभाष गावंड यांची 8 महार रेजिमेंट ही बटालियन. परमवीरचक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणार्या आपल्या रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान होता.  1983 साली 22 वर्षे नोकरी झाल्यावर त्यांनी सैन्यदलातून निवृत्ती घेतली, त्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले 5000च्या वर विद्यार्थी सैन्यात भरती झालेत. त्याबरोबर सैन्य व हवाई दलातले अधिकारीही त्यांनी घडवलेत.

पहाटे येऊरचा डोंगर चढत त्यांनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवलं होतं. सैनिकी जीवनातील अनुभव त्यांनी `लष्करच्या भाकर्या चवदार' व इंग्रजी भाषेतील 'मेजर मेमरीज' या पुस्तकात शब्दबद्ध केलेत. सेन्यातून बाहेर पडल्यावर मेजर गावंड यांनी सर्वप्रथम जिज्ञासा या संस्थेच्या माध्यमातून जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूलची स्थापना केली. गेली 18 वर्षे ही शाळा जोमाने सुरू आहे. 1995 साली सिंघानिया स्कूलमध्ये आणि नंतर इतर ४/५ शाळांत हा उपक्रम सुरू झाला. या ठिकाणी मुलामुलींना एअर रायफल शूटिंग, ड्रील, मॅप रीडिंग, फर्स्टण्ड रेस्क्यू ऑपरेशन फायर फायटिंग असे मिलिटरीसंबंधी सर्व विषय शिकवले जातात. सध्या ठाणे-मुलुंड परिसरातील दीड हजार मुलं या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. ज्या शाळेत मेजर गावंड शिकले, त्याच शाळेत म्हणजे ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते अध्यक्ष होते. या शाळेच्या ठाणे पूर्व शाखेत त्यांनी ऑलिम्पिक स्तरावरची शूटिंग रेज बनवलीय. इथे रीतसर प्रवेश घेऊन 10 ते 80 वयापर्यंतची कोणीही व्यक्ती सराव करू शकते. इथले प्रशिक्षकही देश पातळीवरचे आहेत.

मेजर सुभाष गावंड यांच्या सांसारिक जिवनात ऊर्मिला गावंड यांची उत्तम साथ लाभली. २२ वर्षांच्या देदीप्यमान सैनिकी कारकीर्दीत मेजर गावंड यांना 21 वार्षिक मेरीट पदकांसह 7 विशेष सन्मानपदकं मिळाली. हजारो विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे भूषण पुरस्काराचे ते मानकरी होते. संरक्षण सेवा क्षेत्रात नोकरीच्या सेवा देणार्या संस्थेत ते १९९७ पासून डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी समितीवर त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र या सर्व सन्मानांच्या पलीकडे त्यांना तेव्हा खराखरा आनंद झाला, जेव्हा त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील स्टार वाढले.

English
हिंदी सारांश
Web Title : Retired Army Officer Major Subhash Gawand Passes Away

Web Summary : Major Subhash Gawand, a retired army officer and Thane Bhushan recipient, passed away at 87. An 8 Mahar Regiment veteran, he trained youth in rifle and pistol shooting. He authored books and dedicated his life to military training, with over 5000 students joining the armed forces.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवान