शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

रिपोर्टमुळे सोसायटीची मानसिकता झाली निगेटिव्ह; ठाण्यातील कोरोनाबाधित प्राध्यापकाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 06:23 IST

कोरोनाग्रस्तांना मानसिक आधाराची गरज असते. परंतु, सोसायटीच्या रहिवाशांनी मात्र मला प्रचंड मानसिक त्रास दिला. तरीही, न डगमगता यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन इतर कोरोनाग्रस्तांना लढण्याचे बळ देण्याचे मी ठरविले आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि ही वार्ता हळूहळू संपूर्ण सोसायटीमध्ये पसरली. शेजारच्यांनी तर सर्व संबंध तोड़ून फिनेल, डेटॉल दरवाजात टाकून ठेवले. काहींनी तर आमच्याकडे दूधवाल्याला पाठवणेही बंद केले. कारण, महापालिकेच्या एका महिला अधिकाºयाने सोसायटीच्या रहिवाशांची मानसिकता निगेटिव्ह केली होती, अशी व्यथा जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कोरोनाबाधित झालेल्या प्राध्यापकाने मांडली. कोरोनाग्रस्तांना मानसिक आधाराची गरज असते. परंतु, सोसायटीच्या रहिवाशांनी मात्र मला प्रचंड मानसिक त्रास दिला. तरीही, न डगमगता यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन इतर कोरोनाग्रस्तांना लढण्याचे बळ देण्याचे मी ठरविले आहे.अनलॉक सुरू झाल्यावर १०० दिवसांनी हे प्राध्यापक तोंडाला मास्क, हॅण्डग्लोव्हज, डोक्यावर टोपी ही पुरेशी काळजी घेत महाविद्यालयाची व इतर बँकेची कामे करण्यासाठी बाहेर पडले. मात्र, बाहेरून आल्यानंतर घसा, अंगदुखी, ताप सुरू झाला. नेहमीच्या डॉक्टरकडून चार दिवस औषधे घेतली. डॉ. यशवंत वैद्य यांचा सल्ला घेतल्यावर त्यांनी दोन दिवस वाट पाहू या, असे सांगितले. त्यानंतर, ताप शंभरच्यावर यायला लागल्याने कोरोना टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ३० जून रोजी कोरोनाची तपासणी केली आणि २ जुलै रोजी सायंकाळी हा अहवाल माझ्या हातात येणार होता. परंतु, महापालिकेकडे हा रिपोर्ट गेल्यावर तेथील एका महिला अधिकाºयाने त्या सोसायटीमध्ये राहत असलेल्या तिच्या नातेवाइकांना फोनद्वारे ‘तुमच्या सोसायटीत राहणाºया ठाणा कॉलेजच्या प्राध्यापकाला कोरोना झाला आहे,’ असे कळविले आणि ही वार्ता रिपोर्ट हातात येण्याआधीच म्हणजे दुपारच्या सुमारास संपूर्ण सोसायटीमध्ये हा-हा म्हणता पसरल्याचा आरोप या प्राध्यापकाने केला. योगासने, व्यायाम, शाकाहारी जेवणामुळे वाटले बरे - ठामपाही रुग्णाचे नाव गुप्त ठेवते, मग हातात रिपोर्ट येण्याआधीच माझे नाव कसे बाहेर आले, असा प्रश्नही त्यांनी केला. रिपोर्ट आल्यावर महापालिकेकडून मला फोन आला, त्यावेळी मी त्यांना होम क्वारंटाइन होईन, असे सांगितले. मी घरात एका वेगळ्या खोलीत बंदिस्त होतो. पण, रिपोर्ट आल्यानंतर दुसºया दिवशीच आमच्या दारात कुणी तरी फिनेल, डेटॉल टाकून ठेवले होते. काहींनी तर सेक्रेटरीला, ‘यांना घरात राहायला परवानगी देऊ नका’ असेही सांगितले.- अशा मानसिक त्रासाने कोणतीही कोरोनाबाधित व्यक्ती कोलमडून जाईल, असेही ते म्हणाले. नंतर हळूहळू ताप कमी झाला. ओमकार, योगासने, व्यायाम आणि शाकाहारी जेवण यामुळे एकदम बरे वाटले. मात्र, अशा निराशादायक वातावरणात सोसायटीतील दोन परिवार पहाडासारखे उभे राहिले. सेक्रेटरीच्या पत्नीने पहिल्या दिवसापासूनच जेवणाचा डबा देते, असे सांगितले. हजारो विद्यार्थी, मित्र परिवार प्रत्येकाने मदतीचा हात दिला. ‘त्या’ महिला अधिकाºयाकडे कोरोनाचे रिपोर्ट जात नसल्याने तिचा यात काही संबंध नाही. कोरोनाबाधित रुग्णाचे नाव बाहेर येणार नाही, याची महापालिका पुरेपूर काळजी घेते.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे