शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयासह गडकरी रंगायतनचीही डागडुजी

By admin | Updated: October 12, 2016 04:30 IST

एकीकडे ठाणे महापालिकेने २५ वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना इमारतधारकांना दिल्या असतांना ठामपाने

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने २५ वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना इमारतधारकांना दिल्या असतांना ठामपाने देखील त्यांच्या मालकीच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यानुसार महापालिकेचे मुख्यालय आणि गडकरी रंगायतन या दोन्ही इमारतींची दुरुस्ती होणार आहे. मुख्यालयासाठी ५ कोटी ९२ लाख आणि गडकरी रंगायतनसाठी २ कोटी ६५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे रंगायतनवर सॅटीससारखे छत आच्छादले जाणार आहे. ठामपाने गेल्यावर्षीपासून शहरातील धोकादायक इमारतींचा नव्याने सर्व्हे करुन शासनाच्या निकषानुसार त्यांची ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. ती केल्यानंतर ए वर्गात येणाऱ्या इमारती तत्काळ खाली करुन त्या पाडल्या जात आहेत. तसेच ज्या इमारतींची दुरुस्ती होऊ शकते अशा इमारती बी वर्गात घेतल्या आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे क्रमप्राप्त केले आहे. परंतु, त्याला ठाणेकरांचा अद्यापही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेने आपल्या आस्थापनांच्या इमारतींचेदेखील स्ट्रक्चरल आॅडिट करुन ठाणेकरांपुढे एक आदर्श ठेवण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसत आहे.त्यानुसार महापालिका मुख्यालय आणि गडकरी रंगायतनतचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन घेतले असून यामध्ये मुख्यालय आणि गडकरी रंगायतन पास झाले असून त्या दोघांचीही आता डागडुजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला आहे. ठाणे येथील पाचपखाडी भागात महापालिका मुख्यालयाची इमारत आहे. विविध कामांसाठी नागरिकांना सातत्याने मुख्यालयात यावे लागू नये म्हणून मुख्यालयाचे विकेंद्रीकरण करून प्रभाग समित्यांची निर्मिती केली. त्याचा फायदा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना होत आहे. असे असले तरी प्रभाग समित्यांचा संपूर्ण कारभार मुख्यालय इमारतीच्या नियंत्रणाखालीच चालविण्यात येतो. त्यामुळे प्रभाग समित्या जरी असल्या तरी मुख्यालयाकडे प्रशासकीय केंद्र म्हणून पाहिले जाते. महापालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम १९८९ मध्ये केले असून त्यास आता २७ वर्षे झाली आहेत. स्ट्रक्टरल आॅडिटनुसार या इमारतीचे बांधकाम सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. तरीही इमारतीतील काही दुरुस्तीची कामे अहवालात सुचिवली आहेत. त्यानुसार प्रशासनाने इमारत दुरूस्ती कामांचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये छतावरील गळती, दुरु स्ती आणि रंगरंगोटीचे काम होणार आहे.