वर्धापनदिनाचा प्रशासनाला विसर

By Admin | Updated: October 12, 2016 04:28 IST2016-10-12T04:28:53+5:302016-10-12T04:28:53+5:30

भिवंडी नगरपालिकेची १० आॅक्टोबर १८६४ मध्ये स्थापना झाली. २००१ मध्ये महापालिका म्हणून अस्तित्वात आली. पालिकेला १५१ वर्ष पूर्ण होऊन वर्षभरात एकही कार्यक्रम न

Regarding the anniversary of the administration, forget about the administration | वर्धापनदिनाचा प्रशासनाला विसर

वर्धापनदिनाचा प्रशासनाला विसर

पंढरीनाथ कुंभार / भिवंडी
भिवंडी नगरपालिकेची १० आॅक्टोबर १८६४ मध्ये स्थापना झाली. २००१ मध्ये महापालिका म्हणून अस्तित्वात आली. पालिकेला १५१ वर्ष पूर्ण होऊन वर्षभरात एकही कार्यक्रम न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींना विसर पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इंग्रजांच्या काळात भिवंडी निजामपूर नगरपालिकेस १० आॅक्टोबर १८६४ मध्ये मान्यता मिळाली. नगरपालिकेची भिवंडी नगरपालिका झाल्यानंतर जकात उत्पन्नातून शहराची प्रगती झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न असणारी नगरपालिका म्हणूनही नावाजली. २००१ मध्ये भिवंडी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराचे रूप पालटेल अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारने जकात उत्पन्न बंद केले आणि नगरसेवकांची मानसिकता नसल्याने शहरासाठी विशेष धोरणात्मक काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भ्रष्ट कारभाराचा कळस आणि लोकप्रतिनींधीचे दुर्लक्ष यामुळे सध्या महापालिका आर्थिक संकटात आहे. शहराला कुणीही वाली नाही. शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी आणल्याचा प्रचार नेते करत असले तरी शहराच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही.

Web Title: Regarding the anniversary of the administration, forget about the administration