मीरा भाईंदर मधील गणेशोत्सव मंडपाचे शुल्क कमी करा, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 08:50 PM2018-08-24T20:50:56+5:302018-08-24T20:51:19+5:30

मीरा भाईंदर महापालिके कडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळां कडून मंडप साठी केली जाणारी अवास्तव शुल्क आकारणी बंद करा अशी मागणी मनसेने केली आहे. 

Reduce the Charge of the Ganesh Utsav Mandap in Mira Bhayander, MNS's demand | मीरा भाईंदर मधील गणेशोत्सव मंडपाचे शुल्क कमी करा, मनसेची मागणी

मीरा भाईंदर मधील गणेशोत्सव मंडपाचे शुल्क कमी करा, मनसेची मागणी

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिके कडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळां कडून मंडप साठी केली जाणारी अवास्तव शुल्क आकारणी बंद करा अशी मागणी मनसेने केली आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सव हे महाराष्ट्राचा संस्कृती वारसा जपत असतात. या उसत्वामधून जनप्रबोधन करण्या सह सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका दहा दिवसांकरिता फक्त 100 रुपये मंडप परवाना तसेच 150 रु गेट परवानगी शुल्क आकारत आहे.  ठाणे महानगरपालिकेत सुद्धा मंडप साठी नाममात्र शुल्क घेतले जाते.  परंतु मीरा भाईंदर पालिकेने सदर मंडळाना मंडप परवानगीच्या नावाखाली जिझिया कर लावला आहे. 

महानगरपालिकेने मंडप साठी 1 रु प्रति चौरस. मीटर दर आकारला असून . महानगरपालिकेतर्फे आकारण्यात येणाऱ्या मंडप परवाना शुल्कमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना 5  ते 10 हजार रुपये  दहा दिवसांकरिता मोजावे लागत आहे . सदर शुल्क आकारणी रद्द करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त बालाजी खतगावकर यांना भेटून केली आहे.  मंडप परवाना शुल्कात कपात  करण्यात यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा मनसेने आयुक्त खांतगांवकर यांना दिला आहे. आयुक्तांनी देखील महासभेत हा विषय ठेऊ असे आश्वासन दिल्याचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले . यावेळी हेमंत सावंत, दिनेश कनावजे, नरेंद्र पाटोळे,  सोनिया फ़र्नांडिस, सुषमा बाठे, गौरवी जाधव, रेश्मा तपासे, वैष्णवी येरुनकर, प्रमोद देठे ,  रॉबर्ट डिसोझा, सचिन पोपळे, विजय फ़र्नांडिस आदी सह मनसैनिक उपस्थित होते. 

Web Title: Reduce the Charge of the Ganesh Utsav Mandap in Mira Bhayander, MNS's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.