शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयाची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: January 20, 2016 01:52 IST

अतिरेक्यांच्या रडारवर ठाणे महापालिका असतानादेखील सोमवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर मुख्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाणे : अतिरेक्यांच्या रडारवर ठाणे महापालिका असतानादेखील सोमवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर मुख्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असताना आणि चारही प्रवेशद्वारांवर चोख सुरक्षा यंत्रणा असतानासुद्धा अशा पद्धतीने आंदोलन झालेच कसे, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारच्या आंदोलनानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.सोमवारी हिंदूसेनेने आंदोलन करून पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचे तीनतेरा वाजविले आहेत. अतिरेक्यांच्या रडारवर महापालिका मुख्यालय असतानादेखील अशा प्रकारे पालिकेची सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर उद्या मुख्यालयात येणाऱ्यांची सुरक्षा कोण करणार, असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. मागील काही वर्षांत महापालिका मुख्यालयात अशा प्रकारे आंदोलने वाढत असून यापूर्वीदेखील महासभेच्या प्रवेशद्वारासमोर मुंब्य्रातील शाळेतील मुलांना हाताशी घेऊन राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. मनसेनेदेखील आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते. मागील दोन वर्षांपूर्वी तर उपायुक्तांच्या दालनातच काही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. दीड वर्षापूर्वी परिवहन समितीच्या निवडणुकीच्या वेळेस झालेल्या राड्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी मुख्यालयाच्या चारही प्रवेशद्वारांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्याचे काम रोज सुरू असते. महापालिका आवारात जे कोणी राडा करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर सीसीटीव्हीचाही वॉच ठेवण्यात येत आहे. नऊ प्रभाग समित्यांमधून अतिरिक्त सुरक्षारक्षकांची टीम महापालिका मुख्यालयाच्या चारही प्रवेशद्वारांवर तैनात केली असून २० सुरक्षारक्षक चारही प्रवेशद्वारांवर बंदोबस्तासाठी ठेवले आहेत. यामध्ये आठ महिला सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मेटल डिटेक्टरच्या आत असलेला चौकशी टेबल आता बाहेर ठेवला असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची बॅग, त्यांनी आणलेले साहित्य यांची कसून तपासणी केली जात आहे. त्यातही मुख्य प्रवेशद्वार हे अर्धेच उघडे ठेवले असून आत प्रवेश करणाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात होती. परंतु, ही चौकशी आंदोलनानंतर काही दिवसच होत होती.