शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन २०२० साजरे होणार टपाल सेवेमार्फत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 17:02 IST

त्या पाकिटामधून भावाला राखी सुरक्षितपणे जाणार आहे. ग्राहकांनी या राखी पाकिटाला पसंती दिली आहे.

ठाणे : यंदा करोनाच्या वातावरणात राखी पौर्णिमेला बहिणीला भावाकडे राखी बांधायला जाणे शक्य होणार नाही. अशावेळी टपालखाते मदतीला पुढे सरसावले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष राखी पाकीट उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व टपाल कार्यालयात है राखी पाकीट दहा रुपये या माफक किमतीला उपलब्ध आहे. त्या पाकिटामधून भावाला राखी सुरक्षितपणे जाणार आहे. ग्राहकांनी या राखी पाकिटाला पसंती दिली आहे.

ठाणे विभागात सर्व टपाल कार्यालयात राखी पाकीटाचे बुकिंग करण्यासाठी काउंटर उघडले असून, राखी पाकिटे ट्रे मध्ये लगेच वेगळी करून पुढील गंतव्य स्थानाकडे पाठविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच राखी मेल अंतर्गत त्याच्या वितरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. तसेच प्रवासाकरिता वाहतुकीची व्यवस्थाही उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा अशा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे होण्यासाठी टपालखाते पुढे सरसावले आहेत.राखी भावापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातही विशेष काळजी घेऊन केवळ राखी मेलची डिलिवरी सर्व विभागातील टपाल कार्यालयात रविवारी ०२.०८.२०२० या सुट्टीच्या दिवशी केली जाईल, असे नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांनी एका वृत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शनिवारी बकरी ईदची सुट्टी व सोमवारी रक्षाबंधन आहे. त्यामुळे जनतेला रक्षाबंधनापूर्वी राखी पाकीट मिळावीत यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार, रविवारी दि.०२.०८.२०२० या दिवशी ठाणे विभागातही डाक सेवकानी हजर राहून राखी मेल डिलिवरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भावाला घरबसल्या बहिणीची राखी पोचेल.