शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

रघुवीरनगर झाले कचराकुंडी मुक्त

By admin | Updated: September 25, 2015 02:14 IST

केंद्रातील मोदी सरकारने स्वच्छतेचा नारा देताच डोंबिवलीतील रघुवीरनगरच्या काही महिलांनी एकत्र येत वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेंद्रातील मोदी सरकारने स्वच्छतेचा नारा देताच डोंबिवलीतील रघुवीरनगरच्या काही महिलांनी एकत्र येत वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली. त्यासाठी प्रगत परिसर व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी तो उपक्रम सुरु ठेवला आहे. त्याची दखल घेऊन नगरसेवकाने महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावून सफाई करण्याचा कानमंत्र दिला. त्यासाठी प्रत्येक सोसायटीत मोठे डस्टबीन ठेवण्यात आले आहेत. आता कुठे हा वॉर्ड कचराकुंडी मुक्त होत आहे.याच ठिकाणी केडीएमसीतील एकमेव ट्रॅफिक गार्डन आहे. कै. सुरेंद्र वाजपेयी यांच्या संकल्पनेतून त्याची निर्मिती केली होती, आता त्याचा भार येथील राजेश मोरे वाहत आहेत. बुधवारी त्याचे नामकरण स्व. मीनाताई ठाकरे ट्रॅफिक गार्डन असे करण्यात आले. त्यासाठी मंगळवारचा दिवसरात्र एक करुन त्याची जमेल तशी डागडुजी करण्यात आली. त्यासाठी पालकमंत्री बुधवारी आले होते. परंतु, असे असतांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असणारी ‘सिग्नल यंत्रणा’ कार्यान्वीत करतांना मात्र महापालिका, वाहतूक विभागाला अपयश आले आहे. त्यामुळेच केवळ या गार्डनमध्येच नव्हे तर चार रस्ता येथेही ती यंत्रणा नाही. परिणामी त्याचा त्रास सर्व डोंबिवलीकरांना होतो. पाच वर्षात चार रस्त्याची सिग्नल यंत्रणा केवळ अभावानेच सुरु होती. ती पूर्णपणे सुरु व्हावी, अ‍ॅक्टीव्ह रहावी यासाठी मात्र कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. विशेष म्हणजे या वॉर्डाच्या शुभारंभापासूनच शहरातील मानपाडा या रस्त्याचे आरसीसी रोड करण्यात आला. त्यातून वाहतूककोंडी सुधारेल, तसेच वाहने वेगाने धावतील असा विश्वास होता. परंतु, या दोन्ही बाबी जैसे थे असून अर्धवट आरसीसीमुळे कोणताही उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे शेकडो वाहनचालक त्रस्त आहेत. हीच समस्या शिवमंदिर चौकातही भेडसावते. तेथेही सकाळी व संध्याकाळच्या वेळेत प्रचंड ट्रॅफिक होते, त्यामुळेही नागरिक त्रस्त असतात. याच ठिकाणी महापालिकेच्या डोंबिवली शहरातील एकमेव वैकुंठ स्मशानभूमीचा भूखंड आहे. शहरातील बहुतांशी सर्वच अंत्यसंस्कार येथे होतात. या ठिकाणच्या समस्या अनेक वर्षात सुटलेल्या नाहीत. आता कुठे निवडणुकीच्या तोंडावर तेथील सुविधांसाठी सुमारे ५० लाखांच्या निधीची तरतूद केली. याच ठिकाणी सुमारे १०८ वर्षांचा इतिहास असलेले प्राचिन शिवमंदिर आहे. परंतु, सण उत्सवाच्या विशेषत: श्रावण, महाशिवरात्री आदींच्या सणांमध्ये भक्तांची महापालिकेकडून अथवा नगरसेवकाकडून कोणतीही विशेष काळजी घेतली जात नसल्याचे जनतेचे गाऱ्हाणे आहे. केवळ नाना - नानी पार्क हे ज्येष्ठांसाठी विरंगुळ््याचे साधन आहे. तेथेच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीचा प्रस्ताव असून अद्याप तरी त्यास मूर्त रुप आलेले नाही. केवळ लेवा भवन परिसरात एलईडी पथदिवे लागले असून अन्यत्र कधी लागणार याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. सर्वाधिक वर्दळीचा हा परिसर असल्याने येथे वाहतूककोंडीसह चेन स्रॅचिंगचे प्रमाण अधिक आहे. ते कमी व्हावे यासाठी नगरसेविकेने आता कुठे सीसी कॅमेरे लावण्याचे काम हाती घेतले आहे. पण हे सारे निवडणुकीच्या तोंडावरच का होते आहे ? असा सवाल जनतेचा आहे.