शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: March 21, 2017 01:50 IST

ठाणे महापालिकेतील नवनिर्वाचित विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी झालेल्या महासभेत

ठाणे : ठाणे महापालिकेतील नवनिर्वाचित विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी झालेल्या महासभेत विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनीदेखील या दालनाच्या बाजूने झुकते माप दिल्याने अखेर प्रशासनाने नमते घेऊन सर्वानुमते पहिल्या मजल्यावर ते देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी या वादावरही पडदा पडला. दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्यांचे दालन तळ मजल्यावरील काँग्रेस कार्यालयात हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, त्याचे कामही सुरू झाले होते. परंतु, हे केबिन स्वीकारणार नसल्याचे पत्र विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. त्यानंतरही त्याचे काम सुरूच होते. यासंदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील पत्र देऊन दुसऱ्या मजल्यावर शक्य नसल्यास पहिल्या मजल्यावर त्यांना कार्यालय द्यावे, अशी मागणी केली. याचे पडसाद सोमवारच्या महासभेतदेखील उमटले. विरोधी पक्ष नेते पाटील यांनी कार्यालयाचा मुद्दा उपस्थित करून दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय हटवण्यामागची कारणे प्रशासनाला विचारली. तसेच मनमानी कारभारामुळे तळ मजल्यावर कार्यालय देणार असाल तर मुख्यालयात टेबलखुर्च्या मांडून उघड्यावरच कामकाज करू, असा इशारा दिला. महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही विरोधी पक्षनेत्यांना जुनेच किंवा पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर आणि शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के या दोघांनीही विरोधी पक्षाच्या मागणीप्रमाणे त्यांना कार्यालय देण्याची मागणी केली. अखेर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यास संमती देऊन या वादावर पडदा टाकला. मनमानी कारभाराचा यात काहीच संबंध नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)