शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले न्यायालयीन लढ्याच्या पवित्र्यात

By admin | Updated: September 7, 2016 02:44 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेल्या कारवाईविरोधात फेरीवाला संघटनांनी आता न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेल्या कारवाईविरोधात फेरीवाला संघटनांनी आता न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाला संघटनांनी एकत्रित येऊन न्याय हक्कासाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीची गुरुवारी बैठक होणार आहे. त्यात आगामी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली.फेरीवाला कारवाईविरोधात फेरीवाला संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीत संघटनांतर्फे मागील आठवड्यात तीन विविध मोर्चे काढण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी कारवाईत शिथीलता आणण्याचे आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले असले तरी स्कायवॉक आणि रेल्वेस्थानक समोरील दीपक हॉटेल ते कल्याण बसस्थानक रोड दरम्यानच्या रस्त्यावर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला संघटना मंगळवारी एकत्र आल्या आहेत. मोरे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत संयुक्त संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. महापालिकेची कारवाई बेकायदा आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला नाही. मात्र, तरीही महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या मनात महापालिकेविरोधात रोष आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकात फेरीवाला धोरणावर चर्चा होणार आहे. वेळ पडल्यास फेरीवाले न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील, अशी माहिती मोरे यांनी दिली.नव्याने स्थापन केलेल्या संयुक्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी भाऊ पाटील, सुनील कांबळे, नाना पाटील, बबन कांबळे, सरचिटणीसपदी संजय जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत माळी, चिटणीसपदी राजू सोनावळे, अभय दुबे, रमेश हनुमंते तर सल्लागारपदी प्रशांत सरखोत यांची कार्यकारीणी स्थापन करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)