शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘चुटकीभर गंमत’चे ठाण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

ठाणे : ग्रंथाली प्रकाशित व डॉ. मृण्मयी भजक लिखित ‘चुटकीभर गंमत’ या पुस्तकाचे आणि ‘अमेरिका खट्टी मीठी’ या पुस्तकाच्या ...

ठाणे : ग्रंथाली प्रकाशित व डॉ. मृण्मयी भजक लिखित ‘चुटकीभर गंमत’ या पुस्तकाचे आणि ‘अमेरिका खट्टी मीठी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच ठाण्यात झाले. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ख्यातनाम अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.

‘चुटकीभर गंमत’ हे पुस्तक म्हणजे ‘लोकमत’च्या सखी पुरवणीमधील सदराचा लेखसंग्रह आहे. या पुस्तकाचे प्रकाशन म्हात्रे यांच्या हस्ते झाले. ‘चुटकीभर गमतीचे’ गोड फुलपाखरू विशेषतः या कठीण काळामध्ये आपल्याला किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले. मोठ्या बोजड साहित्याच्या तुलनेत दोन्ही पुस्तकातील हलके-फुलके लेख हे मनाला प्रफुल्लित करून जातात, असेही ते यावेळी म्हणाले.

तर, मधुरा वेलणकर-साटम यांच्या हस्ते ‘अमेरिका खट्टी मीठी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तकातील साठ डॉलरचा आत्मविश्वास, रिपेट्रीएशन, अशा काही लेखांचा उल्लेख साटम यांनी आवर्जून केला. आपल्या भाषणात त्यांनी स्वत्व जपणे, मराठी भाषा अशा मुद्द्यांना स्पर्श केला.

‘ग्रंथाली’चे विश्वस्त धनंजय गांगल यांनी दोन्ही पुस्तकांवर प्रकाशक म्हणून अतिशय मुद्देसूद असे भाष्य केले. हर्षदा बोरकर यांच्या अभिवाचनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले. ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि ग्रंथाली कार्यक्रम संचालक धनश्री धारप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दृक्‌श्राव्य माध्यामातून मुकुंद मराठे, विनय राजवाडे, उमा दीक्षित यांनी त्यांच्या आयुष्यातील ‘गंमत गप्पा’ सांगितल्या. ‘ग्रंथाली’ आणि ‘ऑगस्ट मीडिया ॲण्ड ट्रेनिंग’ या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. भजक यांनी सांगितले अनुभव

डॉ. भजक यांनी आपल्या मनोगतात, निवेदिका आणि लेखिका म्हणून त्यांचा प्रवास कसा झाला हे सांगत सर्वांपरी कृतज्ञता व्यक्त केली. ‘चुटकीभर गंमत’ हे सदर ‘लोकमत’च्या सखी पुरवणीत प्रसिद्ध होत असतानाचे आलेले अनुभव त्यांनी सांगितले.

------------