शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेशी लग्नाचा प्रस्ताव हा स्त्रीत्वाचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बलात्कार करणाऱ्या पुरुषाला पीडितेशी लग्न करणार का, हे विचारणे म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान आहे. ...

-

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बलात्कार करणाऱ्या पुरुषाला पीडितेशी लग्न करणार का, हे विचारणे म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान आहे. अगोदरच तिच्यावर मोठा अत्याचार झाला असताना तिची संमती न घेताच आरोपीला असा प्रस्ताव देणे हे बलात्कारासारख्या भीषण गुन्ह्याचे महत्त्व कमी करण्यासारखे असल्याचे स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या, महिला वकील, शिक्षिका यांचे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीवर नाराजीचे सूर प्रकट होत आहेत. हा प्रस्ताव ताळतंत्र सोडल्याचे लक्षण आहे. लग्न आणि गुन्हा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करणे हा कायद्याने गुन्हाच आहे. बलात्कारी पुरुष लग्नाला तयार झाला तर त्याला शिक्षा करणार नाही का? गेल्या काही वर्षांतील निकाल परंपरावादी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहेत. न्यायाची गंगा उलटी फिरवण्यासारखे आणि संविधान धाब्यावर बसविणे आहे. काही वर्षांपूर्वी असाच प्रस्ताव ठेवण्याची घटना घडली होती तेव्हाच भारतातील सर्व स्त्री संघटनांनी त्याचा निषेध केला होता. पुन्हा असाच निषेध करावा लागतो ही दुर्दैवाची बाब आहे, अशी तिखट प्रतिक्रिया स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी दिली.

भारतीय महिला फेडरेशनच्या सदस्या वंदना शिंदे म्हणाल्या, बलात्कारी पुरुषाशी लग्न करण्याचा प्रस्ताव म्हणजे त्या स्त्रीची परत विटंबना आहे. अशा प्रस्तावामुळे त्या स्त्रीचा स्वाभिमान किती दुखावला जातो याचा सखोल विचार करावा. अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मोठा गुन्हा आहे. अशा प्रस्तावामुळे गुन्हेगारांना मोकळीक मिळेल.

लैंगिक अत्याचार ही घटना पीडितेवर लादली गेलेली असते. त्याच आरोपीशी आयुष्यभर लग्नगाठ बांधायला भाग पाडणे याचा अर्थ त्या स्त्रीवर दररोज मानसिक, शारीरिक अत्याचाराची परवानगी देण्यासारखे आहे. स्त्रीचा मान कोर्टानेच राखला नाही, तर समाज काय राखणार? ज्या स्त्रीवर अत्याचार झालाय तिला आता कोणीच स्वीकारणार नाही, असा गर्भित अर्थ या प्रस्तावात दडला असल्याचे मत वकील अनुराधा परदेशी यांनी व्यक्त केले. तिच्या मनाचा विचार न करता आरोपीला ‘चॉईस’ दिला जातोय हे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

याच न्यायाने एखाद्या घरावर दरोडा टाकून संपत्तीची लूटमार करणाऱ्याला तुला त्या घराचा मालक होऊन त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आहे का, असा प्रश्नही उद्या न्यायव्यवस्थेकडून विचारला जाईल का, असा प्रतिसवाल सामाजिक कार्यकर्ती सुमिता दिघे यांनी केला. बाईच्या अब्रूची किंमत कवडीमोल असल्याची मानसिकता या प्रश्नातून दिसते, असेही त्या म्हणाल्या.

ख्यातनाम लेखक व. पु. काळे यांनी एका ठिकाणी लिहून ठेवले आहे की, सतराव्या वर्षी झालेल्या बलात्कारावर आज सत्तराव्या वर्षी निकाल देताना पुन्हा बलात्कार केला गेला. या वाक्याची आज पुन्हा आठवण झाली, असे नमूद करून शिक्षिका व निवेदिका साधना जोशी म्हणाल्या की, काळ बदलला पण , स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली नाही. स्त्री ही पूर्वी उपभोग्य वस्तू होती व आजही आहे. स्त्रीच्या संपूर्ण भावनिक, शारीरिक, मानसिक विश्वाला उद्ध्वस्त करणाऱ्या बलात्कार करणाऱ्यासोबत कुठली स्त्री संसार करू शकेल? बलात्कार करा आणि लग्न करून मोकळे व्हा, असा विकृत पायंडा त्यातून पडेल.

सारा फाउंडेशनच्या अध्यक्षा सारंगी महाजन यांनी बलात्काराचा गुन्हा हा तडजोडीने सोडविण्याचा विषय असूच शकत नाही, असे मत व्यक्त केले.

............

वाचली.