शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

प्रस्तावित कोचिंग क्लास कायद्याने १० लाख शिक्षक होणार बेकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:26 AM

शासनाच्या शैक्षणिक विभागाने खाजगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरीता कायदा करण्याचे ठरविले असून त्याबाबतचा कच्चा मसुदाही तयार केला आहे. या मसुद्यातील नियम व अटींची पूर्तता सामान्य क्लासेसचे संचालक करू शकत नाहीत.

ठाणे : शासनाच्या शैक्षणिक विभागाने खाजगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरीता कायदा करण्याचे ठरविले असून त्याबाबतचा कच्चा मसुदाही तयार केला आहे. या मसुद्यातील नियम व अटींची पूर्तता सामान्य क्लासेसचे संचालक करू शकत नाहीत. परिणामी राज्यातील ५० हजार क्लासेस कायमस्वरूपी बंद करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे १० लाखाहुन अधिक कर्मचारी बेकार होणार असल्याने सुचविलेल्या सुचनांचा विचार करून कायद्यात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोचिंग क्लासेस संचालक संघटना, ठाणेच्या वतीने देण्यात आला आहे.कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने मंगळवारी आपली भूमिका मांडली. खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणाºया कायद्याचा मसुदा पाहता नामांकित कोचिंग क्लासेसचा फायदा आहे. दरवर्षी हजारो तरूण शिक्षक पेशात येतात. मात्र, गेल्या १० वर्षात शासनाकडून शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. अशावेळी नोकºया उपलब्ध नसल्याने अनेक शिक्षक कोचिंग क्लासेसमधून शिकवितात. परंतु, आता सामान्य क्लासेसना या अटी-नियम लावल्या आहेत. यावर आमच्या सुचनांचा विचार न करता तोच मसुदा मंजूर केल्यास महाराष्टÑातील सुमारे ५० हजार क्लासेस बंद पडून सुमारे १० लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार होतील, अशी भिती संघटनेने व्यक्त केली आहे.मसुदा तयार करण्याच्या समितीमध्ये सर्वसामान्य संचालकाला कोठेही प्रतिनिधीत्व दिले गेले नाही. किंवा त्यांचे मत विचारात घेतलेले नाही. केवळ नामांकित क्लास मालकांच्या संगनमताने तयार केलेला हा मसुदा सामान्य क्लासचालकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेल्या सूचना व मागण्यांचा विचार व्हावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष आनंद भोसले, सचिव सचिन सरोदे, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण आदी उपस्थित होते.खाजगी क्लासेसच्या जाहिरातबाजीवर बसणार चापया मसुद्यात खाजगी क्लासेसना जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी क्लासेसच्या वतीने क्लासमध्ये शिकणाºयाला विद्यार्थ्याला परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीची माहिती व फोटोंचे,क्लासेसच्या सवलतींचे भलेमोठे होर्डिंग लावले जातात.हा मसुदा अंतिम झाल्यास अशाप्रकारच्या जाहिरातबाजीला चाप बसणार आहे. यावर संघटनेने जाहिराती संबंधी स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. जाहिरातीमध्ये फसवणूक, गैरप्रकार व आक्षेपार्ह मजकूर असल्यास योग्य ती कारवाई करावी असे सुचविले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Teacherशिक्षक