शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 21:30 IST

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या आंदोलनांना मनाई आदेशाद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. १ ते १५ मार्च २०२१ या १५ दिवसांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या आंदोलनासह मिरवणूकीला बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या आंदोलनांना मनाई आदेशाद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. १ ते १५ मार्च २०२१ या १५ दिवसांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि घेराव आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. ११ मार्च रोजी महाशिवरात्री तसेच छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन तर १२ मार्च रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव होणार आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलमानुसार तलवारी, लाठया असे कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला मनाई केली आहे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे आदींनाही मनाई आहे. सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच अंत्यसंस्कार आणि लग्न समारंभ यासाठी हा आदेश लागू राहणार नसल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस