शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल

By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2024 19:47 IST

कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे. 

ठाणे : घोडबंदर रोड भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ऑक्टोबर राजी दौरा आयोजित केला आहे. त्यानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल केला असून काही मार्गांवर वन वे वाहतूक केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गुरुवारी दिली. कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे. 

या कार्यक्रमास महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे ते घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता, डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाक्यापर्यंत वाहने उभी पार्क करण्यास मनाई असून हा मार्ग एक दिशा मार्ग (वन वे) केला आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, ती सुरळीत राहण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी शहरातील वाहतूकीमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे घोडबंदर वाहिनी :टायटन हॉस्पिटल कडून डीमार्टकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टायटन हॉस्पिटल येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने टायटन हॉस्पिटलकडून डीमार्टकडे जाण्यासाठी ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्याने कासारवडवली, वाघबीळ ब्रिजखालून सोडली जातील.

घोडबंदर ठाणे वाहिनी : वाघबीळ नाक्या कडून ओवळयाकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व वाहनांना वाघबीळ नाका, सिग्नल येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने वाघबीळ नाक्याकडून आनंदनगर आणि कासारवडवलीकडे जाण्यासाठी टीजेएसबी बँक चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जातील. ही वाहने वाघबीळ नाका कडून ओवळया कडे जाण्यासाठी वाघबीळ ब्रिजखालून मुख्य रस्त्याने साेडली जातील.

असा आहे नो पार्किंग झोनटायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सर्व्हिस रोड तसेच वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका नो पार्किंग झोन राहणार आहे. ही वाहतूक अधिसूचना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ते कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहणार आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा आदेश लागू राहणार नसल्याचेही उपायुक्त शिरसाठ यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणे