शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ईदची जय्यत तयारी

By admin | Updated: September 22, 2015 03:34 IST

मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र समजली जाणारी बकरी ईद २४ सप्टेंबर रोजी असून त्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या पालघर,

डहाणू : मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र समजली जाणारी बकरी ईद २४ सप्टेंबर रोजी असून त्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या पालघर, मनोर, बोईसर, डहाणू, चिंचणी, तारापूर, कासा, वरोती, सावटा येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीसाठी खासकरून अजमेर, राजस्थान तसेच गुजरात राज्यातील सुरत येथून हजारो बकऱ्या महिनाभरापासून जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या चारोटी, मस्ताननाका, विरारफाटा येथे विक्रीसाठी दरवर्षी येत असतात. आवडीचा बकरा खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे.बकरी ईदच्या दिवशी सकाळी सामुदायिक नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधव एक-दुसऱ्यांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत असतात. त्यानंतर, लगेच कुर्बानीची तयारी केली जाते. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजातील लोक हजारो बोकडांची कुर्बानी देत असतात. या बकऱ्या राजस्थान, अजमेर, मारवाड, सौराष्ट्र, सुरत येथून आणल्या जातात. येणाऱ्या बकऱ्यांचे जातीप्रमाणे दर निश्चित करण्यात येतात. खस्ती बकरा तसेच गावठी बोकड दहा हजारांपासून लाख रु.पर्यंत किमतीचा असतो. परंतु, या वर्षी बकऱ्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या वर्षी बकऱ्यांच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा तिपटीने वाढल्या असल्या तरी हजारो मुस्लिम बांधवांच्या घरोघरी कुर्बानीचे बकरे दिसत असून संध्याकाळच्या सुमारास बाजारपेठेत सुंदर, उंच व वजनदार बकरे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, शिरगाव, सातपाटी, चिंचणी, तारापूर, बोईसर, सावटा, वरोती, कासा, चारोटी या भागांतील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदनिमित्त मशीद, दरगाहला रंगरंगोटी करून सर्वत्र रोषणाई करू न बकरी ईदची जोरदार तयारी सुरू केली आहे. (वार्ताहर)