शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाला मोखाड्यात स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:13 IST

जिल्ह्यात इतरत्र सुरुवात; आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने घेतला निर्णय

मोखाडा : राज्यातील जवळपास २२ हजार ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरातील ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार होते. परंतु, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने सामाजिक बांधिलकी जपत पहिल्या टप्प्यातील राज्यव्यापी असहकार आंदोलनाला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी किशोर सोनावणे यांनी ‘लोकमत’ला दिली. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करु न पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवकांना प्रवासभत्ता सरकारी निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवकांसाठी शैक्षणिक पात्रता बदलून पदवीधर ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतन त्रूटी दूर कराव्यात, २००५ नंतर नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ व एक गाव एक ग्रामसेवक धोरण राबवावे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावीत, अशा काही मागण्या आहेत.असे असेल असहकार आंदोलन१३ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येतील. १६ आॅगस्ट रोजी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, १८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर लक्षवेध आंदोलन, २० आॅगस्ट रोजी मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिवांच्या निवासस्थानांसमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येईल. २१ आॅगस्टला मुख्यमंत्री, सर्व मंत्र्यांना भेटून निवेदने देण्यात येतील. यानंतर मात्र २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.डहाणूत आंदोलनास सुरुवातडहाणू : डहाणूत आज ग्रामसेवक संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू करून डहाणू तालुका अध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी बी.एच.भरकसे यांना निवेदन दिले. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.