पोलिसांना मारहाण करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: October 12, 2016 04:25 IST2016-10-12T04:25:02+5:302016-10-12T04:25:02+5:30

भिवंडी-वसई रोडवरील अंजूरफाटा येथे वाहातुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारास पोलीसांनी अटक केली

Police arrested the assailant | पोलिसांना मारहाण करणाऱ्यास अटक

पोलिसांना मारहाण करणाऱ्यास अटक

भिवंडी : भिवंडी-वसई रोडवरील अंजूरफाटा येथे वाहातुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारास पोलीसांनी अटक केली आहे.अंकूश म्हात्रे (५४) असे त्याचे नाव आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ते विरूध्द दिशेने येत होते. अंजूरफाटा चौकात वाहतूक कोंडी झाल्याने ती फोडण्याचे काम करणारे भोईवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी अजित वाडू व बाळा वारंगडे यांनी म्हात्रे यांना विरूध्द दिशेने येण्यास मनाई केली. त्याचा राग येऊन म्हात्रे यांनी शिवीगाळ करीत अजित वाडू यांच्या शर्टाची कॉलर पकडली व मारहाण केली. तसेच त्यांच्या साथीदारांनी बाळा वारंगडे यांनाही मारहाण केली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी म्हात्रे यांना अटक केली.

Web Title: Police arrested the assailant