शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

Coronavirus: आता 'त्या' व्यक्तींनाही थेट घराबाहेर पडता येणार नाही; पोलीस परवानगी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 7:34 PM

पडताळणी करुन ओळखपत्र दिले जाणार; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

ठाणे: विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई बुधवारी ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे कोपरी पोलिसांनी केली. अर्थात यापुढे अत्यावश्यक कारणासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असून त्याबाबतचे ओळखपत्र किंवा परवानगीचे पत्र संबंधित पोलीस ठाण्यांकडून दिले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.ठाणे  शहरासह संपूर्ण राज्यभरात सध्या संचारबंदी लागू झालेली आहे. असे असतानाही अनेक टवाळखोर तरुण मंडळी विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर येत आहेत. काही जण तर कोणतेही कारण नसतांना मुंब्रा ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असाही प्रवास करीत असल्याचे आढळले आहे. ही बाब निदर्शनास येताच आनंदनगर जकात नाका येथे कोपरी पोलिसांच्या गस्ती पथकाने बुधवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान या भागात नाकाबंदी केली होती. त्यावेळी चार जणांचे टोळके मुंब्रा येथून ठाण्यात येत होते. ‘आम्हाला अंधेरी येथे औषधे घेण्यासाठी जायचे आहे,’ अशी बतावणी त्यांनी पोलिसांना केली. मुंब्रा ते ठाणे दरम्यान अनेक औषधांची दुकाने असतांना अंधेरीमध्ये कशासाठी जात आहात? या प्रश्नावर मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर पोलिसांनी त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा करीत लाठीचाही प्रसाद दिला. तर काही वाहन धारकांना पुन्हा ठाण्याच्या दिशेने पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यापुढे एखाद्या गरोदर महिलेला मुंबई किंवा ठाण्यातून पुण्याला जायचे असेल. आजारी रुग्णाला प्रवास करायचा असेल किंवा एखादा भाजी विक्रेता असेल अशा व्यक्तींनी संबंधित पोलीस ठाणे  किंवा पोलीस उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून परवानगी घेणे  आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा झाल्यानंतर अशा अत्यावश्यक बाबींसाठी ओळखपत्र किंवा परवानगीचे पत्र दिले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस