शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या दणक्यामुळे केडीएमसीने धाडला आदेश

By admin | Updated: June 29, 2017 02:45 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कचरागाड्यांवरील ठोकपगारी वाहनचालकांनी तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कचरागाड्यांवरील ठोकपगारी वाहनचालकांनी तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बुधवारी कामबंद आंदोलन सुरू केले. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत प्रभारी आयुक्तांची स्वाक्षरी झालेला वेतन प्रस्ताव तातडीने वाहनचालकांपर्यंत धाडला. घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रभाग अधिकाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या वाहनचालकांना आता वाढीव रकमेसह वेतन मिळणार आहे. अ‍ॅन्थोनी वेस्ट हॅण्डलिंगचे कचरा गोळा करण्याचे दिलेले कंत्राट संपल्यानंतर २०११-१२ मध्ये ठोकपगारी तत्त्वावर १०५ वाहनचालक केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेमले. या चालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. परंतु, त्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव वेळेवर महासभेकडे पाठवला न गेल्याने दोन महिने ते वेतनापासून वंचित राहिले होते. जूनच्या स्थगित महासभेत त्यांच्या मुदतवाढीला मान्यता मिळाली. परंतु, याची अंमलबजावणी झाली नव्हती.आयुक्त पी. वेलरासू हे सध्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्याकडे आहे. परंतु, केडीएमसीत ते फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे येथील कारभाराचे चांगलेच तीनतेरा वाजले आहेत. तसेच याचा फटका या वाहनचालकांच्या वेतनालाही बसला होता. महापालिका प्रशासनाने वाहनचालकांना सोमवारी वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रभारी आयुक्तांच्या स्वाक्षरीअभावी त्यांना मंगळवारीही वेतन मिळू शकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी आंदोलनाला प्रारंभही झाला, परंतु याची माहिती मिळताच प्रशासनाने प्रभारी आयुक्तांचा स्वाक्षरी झालेला वेतन आदेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. मे महिन्यातील स्थायी समितीच्या सभेत ५० वाहनचालक घेण्याच्या प्रस्तावाला मंजूर दिली आहे. किमान वेतन धोरणाचा या वाहनचालकांनाही लाभ द्यावा, असेही निर्देश स्थायीने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या चालकांना १० हजारांहून थेट १६ हजार २०० रुपये वेतन मिळणार आहे. परंतु, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हा लाभ सोडाच, चालकांना वेतनही मिळणे दुरापास्त झाले होते.