शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

हॉटेल व्यावसायिकांकडून कांदाभजी हद्दपार, ऑर्डर दिल्यास ८० रुपये प्लेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:34 AM

कांद्याचे भाव वाढलेले असताना आता हॉटेलमधून कांदाभजी आणि कांद्याचे पदार्थ हद्दपार झाले आहेत.

पंकज पाटील अंबरनाथ : कांद्याचे भाव वाढलेले असताना आता हॉटेलमधून कांदाभजी आणि कांद्याचे पदार्थ हद्दपार झाले आहेत. एवढेच नव्हे तर जेवणावर वाढण्यात येणारे कांदे काढून त्याठिकाणी कोबी देण्याचा प्रकार वाढला आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे ग्राहकांना कांदाभजी किंवा कांद्याचे पदार्थ देणे महाग पडत असल्याने हॉटेलचालकांनी हा निर्णय घेतला आहे.कांद्याचे भाव ८० ते १०० रु पये किलोवर गेल्याने आता अनेक हॉटेलमधून कांदाभजी हद्दपार झाली आहे. कांदाभजी ही तिप्पट किमतीने विकली तरी हॉटेलमालकांना नुकसान सहन करावे लागणार असल्याने कांदाभजी विकण्याऐवजी मेनूकार्डमधून कांदाभजी काढून टाकण्याचा पर्याय हॉटेलमालकांनी निवडला आहे. काही हॉटेलमध्ये ३० रु पये प्लेट मिळणारी कांदाभजी ८० रु पये प्लेट या दराने विकण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. एवढी महाग कांदाभजी कोणीच घेत नसल्याने आॅर्डरप्रमाणे ग्राहकांना कांदाभजीची किंमत सांगूनच ती बनवून दिली जात आहे. काही हॉटेलमालकांना थेट बाजारपेठेतून जो स्वस्त कांदा मिळत होता, तो दरही ७० रु पयांवर गेल्याने हॉटेलमधील अनेक पदार्थ कमी कांद्यावर बनवण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. तर, कोशिंबिरीमधील लागणारा कांदा काढून त्या ठिकाणी कोबी टाकण्यात येत आहे. रस्त्यावर स्वस्तात विकण्यात येणारी कांदाभजी हीदेखील बंद झाली आहे. अनेक ठिकाणी कांद्याऐवजी कोबी चिरून त्याची भजी म्हणून विक्री केली जात आहे. बड्या हॉटेलचालकांनी आपल्या हॉटेलचा दर्जा कायम राहावा, यासाठी कांदा देणे बंधनकारक केले असले तरी त्याचे प्रमाण घटवण्यात आले आहे. लहान हॉटेलपासून मोठ्या हॉटेलचालकांपर्यंत सर्वांनाच वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे फटका बसत असल्याचे हॉटेलचालक सांगत आहेत.।कोबीचा पर्यायशाकाहारी किंवा मांसाहारी बिर्याणीमध्ये कांदा हा अत्यावश्यक बाब असल्याने त्याठिकाणी कांदा वापरला जाईल, अशी ग्राहकांची समजूत आहे. त्यातही कांद्याऐवजी कोबीचा वापर वाढवण्यात आला आहे. बिर्याणीसोबत दिली जाणारी कोशिंबीरही कांद्याऐवजी कोबी चिरून देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी सरसकटपणे कांद्याऐवजी कोबी वापरण्याचा प्रकार हॉटेलमालकांनी सुरू केला आहे. जेवणाचा पदार्थ देण्याआधी टेबलवर कांदा आणि लिंबू देण्यात येत होते, त्यातील फक्त लिंबूच ग्राहकांच्या ताटात येत आहे.