शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

कपडे वाटपाचे आमिष दाखवून वृद्धेचे दागिने लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 22:28 IST

किसननगर येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला साड्या वाटपाचे आमिष दाखवून तिच्याकडील ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना सोमवारी घडली.

ठळक मुद्देदोघांनी केली फसवणूक श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : किसननगर येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला साड्या वाटपाचे आमिष दाखवून तिच्याकडील ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किसननगर क्रमांक-३ येथे राहणारी ही वृद्ध महिला २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यानंतर केसरी निवासजवळील फुलगल्ली येथून पायी जात होती. त्याचवेळी मास्क परिधान केलेले २५ ते ३० वयोगटातील दोघेजण तिथे आले. दोघांपैकी एकाने या वृद्धेला बतावणी केली की, ह्यआजी पुढे जैन मंदिरात बाहेरून आलेले लोक गरीब लोकांना साड्या, चप्पल आणि १२०० रुपयांचे वाटप करीत आहेत. तिथे गरिबासारखे जायचे असल्यामुळे तुम्ही हातातील सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवा,ह्ण असा बहाणा करीत तिचा त्यांनी विश्वास संपादन केला. या वृद्धेने तिच्या हातातील २० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवून एका कापडी पिशवीत ठेवल्या. त्याचवेळी त्याच्या साथीदाराने दोनशे रुपये आणि आंब्याची पिशवी या वृद्धेला देऊन तिची नजर चुकवून आजी, तुम्ही इथेच थांबा आम्ही तुमच्यासाठी साडी, चप्पल आणि पैसे घेऊन येतो, असा पुन्हा बहाणा करीत तिच्याकडील सोन्याच्या बांगड्यांची पर्स घेऊन तिथून पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.आर. सहारे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी