शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे एक दिवसाआड पाणी ?

By admin | Updated: January 26, 2016 02:01 IST

सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील

कल्याण : सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली असून परिणामी कल्याण-डोंबिवलीसह इतर पालिकांवर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र महिनाभरातच कपातीचा दिवस वाढवून एक दिवसाआड पाणी पुरवण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेचा जलउद््भव असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सोमवारी ०. ८० मीटर इतकी खालावल्याने शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी लागू करण्यात आलेली ३० टक्के पाणी कपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावली आणि आम्हाला पाणीटंचाईतून वगळल्याची भूमिका त्यांनी गेतली. त्यांच्याकडून जास्तीचे पाणी उचलले जात आहे. त्यामुळे लघू पाटबंधारे विभाग नेमकी कोणती कारवाई करणार ते समजू शकलेले नाही. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग क्षेत्रांच्या कार्यालयाबाहेर पालिकेने उल्हास नदीतील पाण्याची पातळी खालावल्याचा फलक लावला आहे. उल्हास नदीतून कल्याण-डोंबिवली पालिकेप्रमाणेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आणि स्टेम पाणीपुरवठा योजना पाणी उचलतात. पाण्याचा प्रवाह नियमीत असल्यास बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जात नाही. सध्या तो कमी झाल्याने बारवी व आंध्र धरणातून दररोज एकूण एक हजार ५०० दशलक्ष पाणी लिटर सोडले जाते. ही दोन्ही धरणे यंदा पूर्ण भरलेली नाहीत. त्यातील पाणीसाठयाचे नियोजन करण्यासाठी लघू पाटबंधारे खात्याने ३० टक्के पाणीकपात नोव्हेंंबरपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मिरा-भाईंदर पालिका हद्दीतील पाणी कपात रद्द करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून या महापालिकेने कपातीची अंमलबजावणी केली नाही. नदी पात्रातून दररोज जास्तीचे पाणी उचलले. त्याचा ताण कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागावर आला. नियोजन कोलमडून पडले. परिणामी, सोमवारी कल्याण-डोंबिवलीत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. काही भागात पाणीच आले नाही. शहरभर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. (प्रतिनिधी)