शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील १३ व्यापाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: September 7, 2016 02:43 IST

कल्याण- डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या दरम्यान झालेल्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांनी पुनर्वसन

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या दरम्यान झालेल्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांनी पुनर्वसन व ुदुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बेकायदा बांधकामे केली आहेत. याप्रकरणी प्रशासनाने आतापर्यंत १३ व्यापाऱ्यांना आॅगस्टच्या प्रारंभीच नोटिसा बजावल्या आहेत. मात्र कारवाईला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या वाढीव बेकायदा बांधकामांप्रकरणी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांना निलंबित करा, असा प्रस्ताव शिवसेनेचे स्थायी समितीचे सदस्य मोहन उगले यांनी दाखल केला होता. यावर संबंधित अधिकाऱ्याकडून खुलासा मागवून पुढील सभेत अहवाल ठेवू असे स्पष्टीकरण उपायुक्तसुनील लहाने यांनी दिले आहे.जानेवारीत रेल्वेस्थानक परिसराकडे जाणाऱ्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील असलेल्या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. त्यात काही इमारतीही होत्या. मात्र, रस्ता रुंदीकरणात बांधकामे बाधित झालेल्या काही व्यापाऱ्यांनी सर्रासपणे दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकामे केली आहेत. काही बांधकामांचे इमले दोन ते तीन मजल्यापर्यंत उभारले गेले आहेत. ज्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेश आहेत, त्यांचेही या रस्ता रुंदीकरणात चांगलेच फावले आहे. दरम्यान, उशिरा का होईना नगरसेवक उगले यांनी, याकडे लक्ष वेधत वानखेडे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. यावर झालेल्या चर्चेच्या वेळी वानखेडे यांच्या कारभाराविषयी उगले व सभापती संदीप गायकर यांनी नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांना पदावरून हटवण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच स्थायी समितीच्या सभेत ठराव करण्यात आला होता. परंतु, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले होते. परंतु, या संदर्भात अधिक माहिती घेता स्थानिक नगरसेवक श्रेयस समेळ यांनी जूनमध्येच या वाढीव बांधकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत त्यांनी ‘क’ प्रभाग अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून संबंधित बांधकामांवर कारवाईची मागणी केली होती. यावर वानखेडे यांनी आॅगस्टच्या प्रारंभी १३ व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून बांधकाम परवानगी असल्यास २० आॅगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. आतापर्यंत त्यांच्या सुनावण्या पार पडल्या. परंतु, कारवाईला आजवर मुहूर्त मिळालेला नाही. यावर डाव्या बाजुकडील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्या सुनावण्यात घेण्यात आल्या. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई होईलच. आता उजव्या बाजुकडील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. सर्वेक्षण सुरू असल्याचे स्पष्टीकरण वानखेडे यांनी दिले.