शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर

By admin | Updated: October 12, 2016 04:41 IST

ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार जुन्या ठाण्यातील

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार जुन्या ठाण्यातील कोपरी, वागळे पट्यातील जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे या भागातून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत शिवसेनेमध्ये खलबते सुरु असतांनाच आता ही नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची खंत थेट भाजपाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला ही प्रभाग रचना कशी फायदेशीर ठरु शकते याची कारणमिमांसाच स्थानिक पदाधिकारी श्रेष्ठींकडे विषद करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच भाजपाने अवसान गाळल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ७ आॅक्टोबरला जाहीर झाली. तर प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही प्रसिद्ध झाला आहे. या प्रभाग रचनेनुसार वागळे इस्टेट, कोपरी भागात यंदा नगरसेवकांची संख्या १० ने घटली आहे. नव्या समीकरणानुसार येथून ३२ नगरसेवक निवडून येणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र काहीसा दिलासा मिळाला असून कळव्यातून १६ तर मुंब्य्रातून २० नगरसेवक निवडून येणार असल्याने त्यांना या भागांतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर परिसरातून चार जादा नगरसेवक निवडून येणार असून नव्या रचनेत येथील प्रभागांची संख्या १२ झाली आहे. परंतु जुन्या ठाण्यातील नगरसेवकांची संख्या कमी झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु असे असले तरीदेखील या प्रभाग रचनेचा फायदा हा शिवसेनेलाच होऊ शकतो, किंबहुना ती शिवसेनेच्याच पथ्यावर पडणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे फारसे अस्तित्व नसलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातून तर तब्बल ४५ म्हणजेच एक तृतीयांश नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे पालिकेत स्वबळाची स्वप्ने बघणाऱ्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेचे निरिक्षण केल्यानंतर भाजपच्या विद्यमान नगगरसेवकांची सुद्धा कोंडी होईल अशा पद्धतीची रचना असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.नौपाडा, वृंदावन सोसायटी आदी परिसरातील प्रभागरचना पाहिल्यानंतर तसा संशय घेण्यास जागा असल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)