राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST2021-03-01T04:47:44+5:302021-03-01T04:47:44+5:30

भिवंडी : केंद्र शासनाच्या धाेरणामुळे घरगुती गॅससह पेट्रोल, डिझेलच्या इंधन दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ...

NCP's agitation against fuel price hike | राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

भिवंडी : केंद्र शासनाच्या धाेरणामुळे घरगुती गॅससह पेट्रोल, डिझेलच्या इंधन दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे रविवारी आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भातील वंजारपट्टी नाका येथील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला लावलेल्या मोदींच्या जाहिरातीखालीच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे व कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गॅस दरवाढीचा निषेध म्हणून रिकाम्या गॅस बाॅटला तिरडीवर ठेवून प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली होती. त्याचबरोबर इंधन दरवाढीचा निषेध म्हणून हातगाडीवर मोटारसायकल तसेच चूल ठेवून राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध केला. केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत आहे. केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांचा व इंधन दरवाढीचा निषेध म्हणून रविवारी हे आंदोलन मोदींच्या बॅनरबाजीखाली केले आहे. देशातील जनतेच्या माथी मारलेली इंधन दरवाढ कमी केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिला आहे.

फाेटाे आहे.

Web Title: NCP's agitation against fuel price hike