शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांभोवतीच फिरते राज्य आणि देशाचे राजकारण - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:32 IST

पळपुटे कोण? या सामना लेखावरून राष्ट्रवादी  काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.

ठाणे -  पळपुटे कोण? या सामनामधील लेखावरून राष्ट्रवादी  काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत. कारण गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शरद पवार यांच्या भोवतीच फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचे राजकारण फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असतील, विरोधक असतील, बाळासाहेबांनंतरची पिढी असेल सर्वच जण शरद पवारांवर टीका करत आहेत, असा टोला आव्हाड यांनी लगावला.शिवसेनेवर टीका करताना आव्हाड म्हणाले की, ''इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढतां येतो १९७७ चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल, पण जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळा भळा वाहतील. स्वाभिमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता.''  यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली. ''नितीन गडकरी सारखे आरक्षणाबद्दल का बोलत आहेत. त्यामागे नेमकं काय आहे हे माहित नाही, पण देशात आरक्षण नसावे हा आर एस एस चा अजेंडा आहे. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बाप दादांची पुण्यायी नव्हती. कारण जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा आमचे बाप-दादा गुरंढोर राखत होते, मैला उचलत होते. आम्हाला म्हणजे मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला ५ हजार वर्षे लागली. गेली कित्येक वर्षे देशांतील ८० टक्के मागासवर्गीय समाज गाव कुसा बाहेर ठेवला गेला होता. याचा विचार कधी तरी करा, अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्दयांवर सडकून टीका केली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliticsराजकारण