Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:21 IST2026-04-25T12:19:44+5:302026-04-25T12:21:52+5:30

मोबाइलवर पाहिलेल्या एका ‘ॲक्शन रील’चा अत्यंत भयंकर व दुर्दैवी परिणाम मुंब्रा येथे पाहायला मिळाला. एका १६ वर्षीय मनोरुग्ण भावाने केवळ व्हिडिओचे अनुकरण करण्याच्या नादात आठ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला.

Mumbra: 16-Year-Old Boy Mimics Action Reel, Kills Younger Sister | Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे: मोबाइलवर पाहिलेल्या एका ‘ॲक्शन रील’चा अत्यंत भयंकर व दुर्दैवी परिणाम मुंब्रा येथे पाहायला मिळाला. एका १६ वर्षीय मनोरुग्ण भावाने केवळ व्हिडिओचे अनुकरण करण्याच्या नादात आठ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेची मुंब्रा पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला. हा अल्पवयीन युवक आई-वडील व लहान बहिणीसोबत मुंब्र्यात राहतो. त्याचे वडील शिक्षक आहेत. हा युवक ‘स्किझोफ्रेनिया’ या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर दोन वर्षांपासून उपचार सुरू आहेत.

..अशी घडली घटना 

१५ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्री लहान मुलगी अचानक रडू लागल्याने वडिलांना जाग आली. तेव्हा त्यांना मुलाच्या हातात रक्ताने माखलेला चाकू दिसला आणि मुलीच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. भेदरलेल्या वडिलांनी तातडीने मुलीला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सलग चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, १९ एप्रिल रोजी सकाळी या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला.

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?

स्किझोफ्रेनिया हा मेंदूशी संबंधित एक गंभीर आणि गुंतागुंतीचा मानसिक आजार आहे. यामुळे व्यक्तीच्या विचार करण्याच्या, भावना व्यक्त करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीवर खूप मोठा परिणाम होतो. आजारात व्यक्तीचा वास्तवाशी संपर्क तुटतो.

लढाईचा व्हिडीओ पाहून केले अनुकरण

बहिणीवर वार केल्यानंतर हा तरुण घाबरून घरातून पळून गेला होता. नंतर वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. मोबाइलवर लढाईचा (फाईट सिक्वेन्स) एक व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण अगदी तसेच करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात चुकून बहिणीला दुखापत झाल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुंब्रा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. एका ‘रील’मुळे हसतंखेळतं घर उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : मुंब्रा त्रासदी: 'एक्शन रील' घातक, आठ वर्षीय बच्ची की मौत

Web Summary : मुंब्रा में, एक 16 वर्षीय लड़के ने 'एक्शन रील' से प्रभावित होकर अपनी 8 वर्षीय बहन पर चाकू से जानलेवा हमला किया। चार दिनों तक अस्पताल में जिंदगी के लिए जूझने के बाद लड़की की मौत हो गई। सिज़ोफ्रेनिया से पीड़ित लड़के ने वीडियो की नकल करने की बात कबूल की। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Mumbra Tragedy: 'Action Reel' Turns Fatal, Eight-Year-Old Girl Dies

Web Summary : In Mumbra, a 16-year-old, influenced by an 'action reel,' fatally attacked his 8-year-old sister with a knife. The girl died in the hospital after battling for four days. The boy, suffering from schizophrenia, confessed to mimicking the video. Police have registered a case.